सैराट चित्रपटानंतर नागराज मंजुळे दिसणार या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 17:33 IST2017-02-23T11:35:40+5:302017-02-23T17:33:27+5:30

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने जागतिक पातळीवरदेखील यश मिळविले आहे. ...

In the film, after the film Sairat, Nagraj Manjule will appear | सैराट चित्रपटानंतर नागराज मंजुळे दिसणार या चित्रपटात

सैराट चित्रपटानंतर नागराज मंजुळे दिसणार या चित्रपटात

गराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने जागतिक पातळीवरदेखील यश मिळविले आहे. या चित्रपटाप्रमाणेच यातील कलाकारांनीदेखील प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. त्यामुळे साहजिकच सैराट चित्रपटानंतर या कलाकारांचे आगामी चित्रपट कोणते असतील याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागली असणार हे नक्की. आर्ची आणि परशा यांचे आगामी चित्रपटाची चर्चा तर आहेच. मात्र दिग्दर्शक नागराज मंजुळे हे कोणत्या चित्रपटात अभिनय करणार याचीदेखील चुणचूण प्रेक्षकांना लागली आहे. त्यामुळे नागराजनागराज चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रेक्षकांचा हा लाडका दिग्दर्शक 'द सायलेन्स' या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटात नागराजची भूमिका काय असणार आहे अदयापदेखील कळाले नाही. 
       
        नागराज मंजुळे हे दिग्दर्शनाप्रमाणेच अभिनयक्षेत्रातदेखील त्यांनी प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. त्यांच्या सैराट या चित्रपटातील मजेशीर भूमिकादेखील प्रेक्षकांनी  अनुभवली आहे.त्यामुळे द सायलेन्स या चित्रपटातील भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की. त्यांच्या या चित्रपटाने अनेक फिल्म फेस्टीव्हलमध्ये आपली जागा निर्माण केली असल्याचे समजत आहे. म्हणूनच या चित्रपटाची वाट प्रेक्षक आतुरतेने करत असल्याचे दिसत आहे. नागराज सध्या हिंदी सैराटचे दिग्दर्शन करत असल्याचेदेखील समजत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात बॉलिवुडचे तगडे कलाकार अमिताभ बच्चन झळकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागराज मंजुळे यांच्या हिंदी रिमेककडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असल्याचे कळत आहे. या चित्रपटात आर्चीच्या भूमिकेत जान्हवी कपूर असणार आहे. 

Web Title: In the film, after the film Sairat, Nagraj Manjule will appear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.