भय वेगळ्या पठडीतला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 14:47 IST2016-12-01T15:55:21+5:302016-12-03T14:47:13+5:30
वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे सध्या मराठीत येऊ घातले आहेत. प्रेक्षकवर्गाकडूनही वेगळ्या पठडीतल्या सिनेमांच चांगल स्वागत होत आहे. असाच वेगळ्या आशयाचा ...
.jpg)
भय वेगळ्या पठडीतला सिनेमा
व गवेगळ्या धाटणीचे सिनेमे सध्या मराठीत येऊ घातले आहेत. प्रेक्षकवर्गाकडूनही वेगळ्या पठडीतल्या सिनेमांच चांगल स्वागत होत आहे. असाच वेगळ्या आशयाचा ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित भय हा सिनेमा आहे. वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची व संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.माणसाचे मन ही मोठी अजब गोष्ट आहे. मनाचे भाव, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचा विज्ञानाला उलगडा झाला आहे. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते. ही भीती कशाचीही असू शकते. उंचीची, गदीर्ची, एकटेपणाची अगदी कशाचीही भीती एखाद्याला सतावत असते. या भीतीवर मात न करता येणाºया व्यक्तीची काय अवस्था होत असेल? भीती मनात ठेऊन जगणाºया व्यक्तींना काय अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंगवून टाकणारा प्रवास म्हणजे...भय हा चित्रपट. वेगळा विषय, खिळवून ठेवणारं कथानक यासोबतच भय चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे दुबईच्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेल्या यातील दोन गाण्यांद्वारे दुबईतील गगनचुंबी इमारती, अलिशान क्रुझ, हेलिपॅडवरील दृश्ये तसेच प्रसिद्ध बीचेसची अनोखी सफर घडते. अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे विनीत शर्मा, सिद्धार्थबोडके, शेखर शुक्ला, नुपूर दुधवाडकर, धनंजय मांद्रेकर यांचा अभिनय भय चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल. शेखर अस्तित्व यांनी लिहलेल्या तीन वेगवेगळ्या जॉनरच्या गीतांना विक्रम माँटोरोज याचं संगीत लाभलं आहे. गायक तुलिका उपाध्याय, ब्रिजेश शांडिल्य, अली असलम यांच्या सुमधुर आवाजात ही गीते स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाचे सहनिमार्ते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निमार्ता आहेत. सहकारी निमार्ते अनिल साबळे आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचं आहे. नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आहेत. दमदार कथानक, श्रवणीय संगीत आणि त्याला कल्पक दिग्दर्शनाची जोड यामुळे ह्भयह्ण हा चित्रपट रसिकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. तामिळ, तेलगु, अरेबिक या तीनही भाषेत भय प्रदर्शित केला जाणर आहे