परश्यानंतर 'फँड्री'तला जब्याचा झाला मेकओव्हर, समोर आला त्याचा डॅशिंग लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 19:44 IST2021-02-08T19:43:15+5:302021-02-08T19:44:50+5:30
विशेष म्हणजे फँड्री पाहून आमीर खान तर जब्याच्या प्रेमातच पडला होता. इतकंच नाही तर त्यानं जब्याची भेटही घेतली. शिवाय सोशल नेटवर्किंग साईटवरही त्याचं कौतुक केलं होतं.

परश्यानंतर 'फँड्री'तला जब्याचा झाला मेकओव्हर, समोर आला त्याचा डॅशिंग लूक
'फँड्री'तल्या सोमनाथ अवघडेने त्याच्या पहिल्याच सिनेमातून रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती. इतकेच काय त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वच स्तरांतून कौतुक झाले होते. ‘फँड्री’ तील उत्कृष्ट अभिनयासाठी सोमनाथ अवघडे याच्या ‘जब्या’च्या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एवढ्या कमी वयात बॉलीवुडच्या दिग्गजांकडून शाबासकी मिळवल्यानं कुणीही त्याला छोटा बच्चा म्हणण्याची चूक करणार नाही अशीच इतक्या छोट्या वयाती त्यांची अदाकारी होती. विशेष म्हणजे फँड्री पाहून आमीर खान तर जब्याच्या प्रेमातच पडला होता. इतकंच नाही तर त्यानं जब्याची भेटही घेतली. शिवाय सोशल नेटवर्किंग साईटवरही त्याचं कौतुक केलं होतं. पण तरीही 'जब्या' मात्र दुस-या सिनेमात दिसलाच नाही.
पूर्वीचा जब्या म्हणजेच सोमनाथ इतक्या वर्षात फार बदलला आहे. नुकताच त्याच डॅशिंग लूक समोर आला आहे. मात्र हा लूक पाहून भल्याभल्यांचीही बोलती बंद नाही झाली तरच नवल. अभिनय कौशल्याबरोबर त्याने त्याच्या लूक्सवरही मेहनत करत डॅशिंग लूक मिळवला आहे. जब्याची नवीन स्टाईल स्टेटमेंट रसिकांनाही भावली आहे. त्याच्या फॅन्सकडून यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. सोमनथा त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर चर्चेत आहेच पण त्याच्या नवीन लूकमुळेही चर्चेत आहे.
आगामी ‘फ्री हिट दणका’या मराठी सिनेमात सोमनाथ पुन्हा एकदा झळकणार आहे. येत्या १६ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील सोमनाथचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. सोमनाथचा या सिनेमातला लुक पाहून आणि हातात बॅट पाहून हा सिनेमा क्रिकेटच्या अवती भवती फिरणारा तर नाहीना? आणि सिनेमाच्या नावातूनही क्रिकेटशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच मिळतील.
मात्र सोमनाथच्या फॅन्ससाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. यापूर्वीच या सिनेमातील अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) ही हिट जोडी जाहीर करण्यात आली आहे. वॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पोस्टरमध्ये सर्वत्र प्रेमाचाच रंग विखुरलेला आहे. प्रेम आणि प्रेमाच्या विविध छटा पोस्टरमध्ये लक्ष वेधून घेत आहे.