'देखता है तू क्या...' गाण्यावर जब्याच्या शालूचा आरशासमोर डान्स, व्हिडीओला मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:55 IST2025-05-27T16:55:27+5:302025-05-27T16:55:56+5:30
Rajeshwari Kharat : 'फँड्री' फेम शालू उर्फ अभिनेत्री राजेश्वरी खरात सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.

'देखता है तू क्या...' गाण्यावर जब्याच्या शालूचा आरशासमोर डान्स, व्हिडीओला मिळतेय पसंती
'फँड्री' फेम शालू उर्फ अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. राजेश्वरी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओही शेअर करत असते. नुकतेच तिने एक नंबर, तुझी कंबर गाण्यावर रिल बनवला होता. या रिलला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता तिने एका दुसऱ्या गाण्यावर रिल बनवला आहे. या व्हिडीओला देखील चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्रामवर रिल शेअर केला आहे. यात ती देखता है तू क्या या गाण्यावर आरशासमोर उभी राहून थिरकताना दिसते आहे. या गाण्यावर तिने खूप छान डान्स केला आहे. तिच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. नेटकरी तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' चित्रपट २०१४ साली रिलीज झाला होता. या चित्रपटातून जब्या आणि शालू या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. चित्रपट रिलीज होऊन इतके वर्ष उलटले असले तरी हे कलाकार आजही तितकेच चर्चेत येत असतात. शालूची भूमिका राजेश्वरी खरातने आणि जब्याची भूमिका सोमनाथ अवघडेने साकारली. या चित्रपटानंतर ते दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. ते दोघे या चित्रपटात पती पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल त्यांनी सोशल मीडियावर अपडेट दिले होते. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक समजलेले नाही.