​‘संघर्ष यात्रा’च्या प्रदर्शनाची तारीख अजूनही गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 21:39 IST2016-03-23T04:39:34+5:302016-03-22T21:39:34+5:30

गरीबांचा कैवारी म्हणून ओळखल्या जाणाºया गोपिनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्ष यात्रा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ...

The exhibition date for 'Sangharsh Yatra' is still in Guldasti | ​‘संघर्ष यात्रा’च्या प्रदर्शनाची तारीख अजूनही गुलदस्त्यात

​‘संघर्ष यात्रा’च्या प्रदर्शनाची तारीख अजूनही गुलदस्त्यात

ीबांचा कैवारी म्हणून ओळखल्या जाणाºया गोपिनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्ष यात्रा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ११ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र मुंडे यांची कन्या  आणि राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी काही प्रसंगांना कात्री लावण्याची सूचना केल्यामुळे दिग्दर्शक साकार राऊत यांना हे प्रसंग वगळावे लागले.

त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. मात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? हे अद्यापही जाहिर करण्यात आले नाही. या चित्रपटाचे पे्रक्षकांसह कार्यकर्त्यांनाही प्रदर्शनाचे  वेध लागले आहे. 

सिद्धीविनायक मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होणाºया या चित्रपटात शरद केळकर गोपिनाथ मुंडे यांची भूमिका साकारणार आहेत. पंकजा मुंडे  यांचा रोल श्रृती मराठे करीत आहे, तर ओंकार कर्वे प्रमोद महाजन, दीप्ती भागवत प्रज्ञा मुंडे आणि गिरीश परदेशी प्रवीण महाजनाची भूमिका साकारणार आहेत. 

Web Title: The exhibition date for 'Sangharsh Yatra' is still in Guldasti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.