Exclusive प्रिया झाली साईज झिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 18:55 IST2016-08-09T13:25:47+5:302016-08-09T18:55:47+5:30
प्रियांका लोंढे मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी प्रिया बापट आजही ...

Exclusive प्रिया झाली साईज झिरो
प्रियांका लोंढे
मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी प्रिया बापट आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजपर्यंत विविध चित्रपटांमध्ये वेगळ््या धाटणीच्या भुमिकांमधूनच प्रिया सर्वांना पहायला मिळाली. मराठी चित्रपटसृष्टीची ही बबली गर्ल सध्या खुपच बारीक झालेली दिसत आहे. प्रिया तिच्या फिटनेस बाबत फारच जागृत असते. तिने बरेच वजन कमी केल्याचे तिच्या सध्याच्या काही फोटो मधून दिसत आहे. याविषयी प्रियाने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या फिटनेस फंड्या विषयी उलगडा केला. प्रिया सांगते, मला नेहमीच फिट रहायला आवडते. तुम्ही जेवढे निरोगी रहाला तेवढे चांगले काम करु शकता. व्यायाम केल्याने खुपच उर्जा मिळते. ताजेतवाने वाटते आणि त्यामुळे काम करण्यासाठी स्फुर्ती मिळते. मी काही जाणुनबूजुन वजन कमी केलेले नाही. मला जिम मध्ये वर्क आऊट करायला खुप आवडते. त्यामुळे मी वजन कमी करण्यापेक्षा फिटनेसवर जास्त भर देते. रोज मी सकाळी व्यायाम करते. एवढेच नाही तर मला स्विमिंग करायलाही आवडते. पोहण्यामुळे संपुर्ण शरीराचा योग्य व्यायाम होतो. जिम आणि स्विमिंग या दोन गोष्टी माझ्या फिटनेसचा गुरुमंत्र आहेत. केवळ चित्रपटांमध्ये बारीक दिसावे म्हणुनच वजन कमी करणे ही गोष्ट मला पटत नाही. वैयक्तिक आयुष्यात देखील नेहमी सुंदर आणि ताजेतवाने राहण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. प्रियाचा गच्ची हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. परंतू तिचा हा साईज झिरो लुक कोणत्याही चित्रपटासाठी नसल्याचे प्रियाने स्पष्ट केले आहे.
![]()