Exclusive नसिरुद्दीन शहांचे मिलिंद शिंदेंना सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:23 IST2016-08-03T10:53:37+5:302016-08-03T16:23:37+5:30
प्रियांका लोंढे भारदस्त आवाज, अनोखी अभिनय शैली आणि प्रखर व्यक्तिमत्व ...
.jpg)
Exclusive नसिरुद्दीन शहांचे मिलिंद शिंदेंना सरप्राईज
भारदस्त आवाज, अनोखी अभिनय शैली आणि प्रखर व्यक्तिमत्व असलेले अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी बॉलिवुडमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे. प्रेक्षकांना नेहमीच ते वेगळ््या अंदाजात प्रत्येक चित्रपटात पहायला मिळतात. पण तुम्ही म्हणाल की मिलिंद शिंदे आणि नसिरुद्दीन शहा यांचा काय संबंध. तर नॅशनल स्कुल आॅफ ड्रामा मध्ये नसिरुद्दीन शहा अनेक वर्षांपासुन अभिनयाचे प्रशिक्षण देत आहेत. चित्रपटसृष्टीला अनेक दजेर्दार अभिनेते नसिरुद्दीन शहांनी दिले आहेत. आणि त्यातीलच एक अभिनेता म्हणजे मिलिंद शिंदे. नूकताच मिलिंद शिंदे यांच्या मोबाईलवर एक आॅडिओ मेसेज आला. तो कोणी पाठवला काहीच माहित नव्हते. जेव्हा तो ऐकला तेव्हा त्यातील आवाज ऐकुन मिलिंद शिंदे एकदमच अवाक झाले कारण तो आवाज होता नसिरुद्दीन शहांचा. हा आॅडिओ मिलिंद शिंदेंनी सीएनएक्ससोबत शेअर करुन नसिरुद्दीन सरांच्या आठवणींना उजाळा दिला. साक्षात आपल्या गुरुंनी आपले कौतुक केले यासारखा दुसरा आनंद नाही. मी माज्या प्रत्येक मुलाखतीमध्ये नसिरुद्दीन सरांना क्रेडीट देतो. हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी एक आॅडिओ मेसेज रेकॉर्ड करुन मला पाठवला. ते म्हणाले आत्तापर्यंत २०० विद्यार्थि माज्या हाताखालुन गेले पण तु या सर्वांमध्ये नेहमीच वेगळा आहेस. तुज्या कामाचे संपुर्ण श्रेय हे फक्त तुझेच आहे. मी एनएसडी मध्ये तिसºया वर्षात असताना नसिरुद्दीन सर आम्हाला शिकवायला होते. ज्यांना पाहुन आपण एनएसडीला अॅडमिशन घेतो खुद्द तेच समोर दिसल्यावर आकाश ठेंगणे होते. पहिल्याच लेक्चरला प्लीज फरगेट आय अॅम अ फिल्म स्टार हे त्यांचे वाक्य आजही मला आठवते. नगर मधील छोट्याशा गावातून आलेला मी आज जे काही आहे ते फक्त नसिरु द्दीन सरांमुळेच. खरच आहे म्हणा, गुरुंनी त्याच्या शिष्याला दिलेले हे एक अविस्मरणीय सरप्राईजच होते.