​Exclusive : मुक्ता बर्वे लवकरच दिसणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 16:41 IST2017-07-03T11:11:22+5:302017-07-03T16:41:22+5:30

मुक्ता बर्वेने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचे नाटक खूप गाजले होते. ...

Exclusive: Mukta Barve will appear shortly on small screens | ​Exclusive : मुक्ता बर्वे लवकरच दिसणार छोट्या पडद्यावर

​Exclusive : मुक्ता बर्वे लवकरच दिसणार छोट्या पडद्यावर

क्ता बर्वेने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचे नाटक खूप गाजले होते. त्यानंतर ती घडतंय बिघडतंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती चित्रपटांकडे वळली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतरचे जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट तर खूप गाजले. आज मराठीतीत आघाडीची अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे पाहिले जाते. 
चित्रपटात व्यग्र असतानाही मुक्ताने एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत काम केले होते. या मालिकेत स्वप्निल जोशी तिच्यासोबत झळकला होता. या मालिकेतील तिची भूमिका, स्वप्निलसोबतचे तिचे ट्युनिंग प्रेक्षकांना खूपच आवडले होते. या मालिकेनंतर मुक्ताला पुन्हा मालिकेत पाहाण्याची तिच्या फॅन्सची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे.
मुक्ताच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. मुक्ता लवकरच एका मालिकेत झळकणार असल्याचे कळतेय. मुक्ता कोणत्या मालिकेत झळकणार, तिची भूमिका काय असणार याबाबत तिने मौन राखणेच पसंत केले आहे. पण मुक्ता लवकरच मालिकेत काम करणार असल्याचे तिनेच सांगितले आहे. ती लवकरच छोट्या पडद्यावर परतणार अाहे.
मुक्ता सध्या तिच्या हृद्यांतर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तिची आणि सुबोध भावेची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुक्ता या मालिकेत आपल्याला आईच्या भूमिकेत दिसणार आहे. कोणत्याही चित्रपटात आईची भूमिका साकारण्याची मुक्ताची पहिलीच वेळ आहे. या चित्रपटासाठी मुक्ता खूपच उत्सुक आहे. 

Also Read : तेजश्री प्रधानने मुक्ता बर्वेला काय विचारले?

Web Title: Exclusive: Mukta Barve will appear shortly on small screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.