Exclusive देवा चित्रपटात अंकुश-स्पृहा-तेजस्वीनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 16:20 IST2016-08-17T10:49:46+5:302016-08-17T16:20:37+5:30
प्रियांका लोंढे साऊथच्या चित्रपटांचे रिमेक करण्याची पद्धत आता मराठीमध्ये देखील हिट होऊ लागली ...

Exclusive देवा चित्रपटात अंकुश-स्पृहा-तेजस्वीनी
प्रियांका लोंढे
साऊथच्या चित्रपटांचे रिमेक करण्याची पद्धत आता मराठीमध्ये देखील हिट होऊ लागली आहे. आता साऊथचे दिग्दर्शक मुरली चार्ली या मल्याळम सिनेमाचा रिमेक मराठीमध्ये करीत आहेत. देवा असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. तसेच तेजस्वीनी पंडित आणि स्पृहा जोशी यांच्या देखील दमदार भूमिका या चित्रपटात असल्याचे कळते. साऊथचा सिनेमा मराठीत करायचा हा विचार घेऊन आलेले दिग्दर्शक मुरली यांना कोकणाच्या सौंदर्याने भुरळ घातली असावी. म्हणुनच की काय या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या कोकणात सुरू आहे. साऊथच्या सिनेमाचा रिमेक जरी असला तरी तो मराठमोळ््या पद्धतीने दाखविण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न असेल. अंकुश, स्पृहा आणि तेजस्वीनी हे तिघे देखील प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करीत आहेत. देवा या पात्रा सभोवती संपुर्ण चित्रपट फिरत असल्याने यामध्ये देवाचा म्हणजेच अंकुशचा प्रवास दाखविण्यात आला आहे. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या चार्ली सिनेमामध्ये डलक्युर सलमान, पार्वती मेनन आणि अपर्णा गोपीनाथ यांनी भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट साऊथमध्ये सुपरहिट तर झालाच परंतू समीक्षकांनी देखील या चित्रपटाची प्रशंसा केली. आता देवा,टिसा आणि अपर्णा अशा व्यक्तिरेखा असलेल्या देवा या मराठमोळ््या चित्रपटाला प्रेक्षक किती पसंती दर्शवितात हे तर अपल्याला लवकरच समजेल.
![]()