Exclusive गायत्री झोपली चक्क बेंचवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 15:43 IST2016-07-05T10:13:28+5:302016-07-05T15:43:28+5:30
प्रियांका लोंढे मालिका अन चित्रपटांतून आज ...
.jpg)
Exclusive गायत्री झोपली चक्क बेंचवर
मालिका अन चित्रपटांतून आज घराघरात पोहचलेली आपली सोज्वळ अभिनेत्री गायत्री सोहम ही एका मॉल समोरील बेंचवर चक्क झोपली होती. आता गायत्रीवर अशी काय वेळ आली की तिला या ओपन बेंचवर झोपावे लागला असा प्रश्न तर नक्कीच तिच्या चाहत्यांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. रेती अन परतू यासारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता गायत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळली आहे. गायत्रीच्या मते तुम्ही जेवढे मालिकांमध्ये काम करता तेवढ्या जास्त प्रमाणावर तुमच्या चाहत्यांपर्यंत पोहचु शकता. पण आता ही पठ्ठी चक्क रस्त्यावरील बेंचवर झोपलीये ती कोणत्या चित्रपटाच्या किंवा मालिकेच्या चित्रीकरणासाठी नाही तर मस्तपैकी एक झोप काढण्यासाठी गायत्रीने डायरेक्ट बेंचचाच सहारा घेतला आहे.
सीएनएक्सने याबद्दल गायत्रीला विचारले असता, ती म्हणाली, मालिकेच्या चित्रीकरणासाठी आम्ही सकाळी सहा वाजता एका मॉलच्या येथे पोहचलो. परंतू तिथे गेल्यावर समजले की आमच्या टिममधील कोणीच शुटिंग स्पॉटवर उपस्थित नव्हते. लवकर शुटिंगला जायचे म्हणुन मी सकाळी पाच वाजता उठले होते अन त्यामुळे माझी झोप देखील कम्लिट झाली नव्हती. त्यात सकाळची वेळ असल्याने मॉल सुद्धा ओपन नव्हता. भुक पण लागली होती अन झोप पण येत होती. मग मॉलच्या समोरच असलेल्या एका लाकडी बेंचवर मी लगेचच जाऊन झोपले. तेवढ्यात माझ्या कोअॅक्टरने माझे फोटो काढुन ती अनफरगेटेबल मोमेंट कॅमेरॅत कैद करण्याची संधी सोडली नाही. क्या बात है गायत्री तुझा रावडी अंदाज तुझ्या चाहत्यांना मात्र नक्कीच आवडेल. पण तुला आमच्याकडुन एक फुकटचा सल्ला म्हणजे रस्त्यावरच्या बेंचवर अस झोपताना जरा जपुनच रहा.