Exclusive चेतन रमणार प्रेमकथेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 14:21 IST2016-12-01T14:14:20+5:302016-12-01T14:21:01+5:30

  बेनझीर जमादार प्रेमकथा हा प्रेक्षकांच्या अगदी जिव्हाळयाचा विषय आहे. प्रेमकथावर आधारित असणारी कथा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला ...

Exclusive Chetan plays in Premkathe | Exclusive चेतन रमणार प्रेमकथेमध्ये

Exclusive चेतन रमणार प्रेमकथेमध्ये

ong>  बेनझीर जमादार

प्रेमकथा हा प्रेक्षकांच्या अगदी जिव्हाळयाचा विषय आहे. प्रेमकथावर आधारित असणारी कथा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळतात. यापूर्वीदेखील प्रेक्षकांनी प्रेमावर आधारित असणारे चित्रपट उचलून धरले आहेत. आता असाच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता चेतन चिटणीस झळकणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सला चेतन सांगतो, हा एक रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट आहे. तसेच हा चित्रपट म्युझिकलदेखील आहे. कारण या चित्रपटात प्रेक्षकांना दहा गाणी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा होता. या चित्रपटात मी स्ट्रगल करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. तसेच माझ्यासोबत या चित्रपटात कृतिका गायकवाडदेखील असणार आहे. फोटोकॉपी, वजनदार आणि आता हा चित्रपट अशा तिन्ही चित्रपटात वेगवेगळया भूमिका साकारण्यास मिळाल्या याचा अधिक आनंद होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विनय घोलप असून, निर्माते हितेश पटेल हे आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण संपूर्ण मुंबई येथे करण्यात आले आहे. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अदयाप ही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की. अभिनेता चेतन चिटणीस हा यापूर्वी फोटोकॉपी या चित्रपटात अभिनेत्री पर्ण पेठेसोबत प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. तसेच त्याचा नुकताच वजनदार हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. तसेच अभिनेत्री कृतिका गायकवाड ही यापूर्वी अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली होती. तसेच तिने चित्रपटदेखील केले आहे.


   

Web Title: Exclusive Chetan plays in Premkathe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.