उर्मिला का म्हणतेय सर्वांना थँक्यु
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 14:05 IST2017-01-01T14:05:11+5:302017-01-01T14:05:11+5:30
अभिनेत्री उर्मिला कोठारे नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. उर्मिला चांगली नृत्यांगणा देखील आहे. आपल्या नृत्याच्या दिलखेच ...

उर्मिला का म्हणतेय सर्वांना थँक्यु
अ िनेत्री उर्मिला कोठारे नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. उर्मिला चांगली नृत्यांगणा देखील आहे. आपल्या नृत्याच्या दिलखेच अदांनी तिने तमाम प्रेक्षकांना घायाळ केले आहे. परंतू सध्या उर्मिला सर्वांचे आभार प्रकट करताना दिसत आहे. सोशल साईट्सवर ही दुनियादारी गर्ल बºयाचजणांना थँक्यु म्हणताना दिसत आहे. आता उर्मिला असे का करतेय हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर उर्मिला नवीन वर्षाच्या स्वागताला तयार होण्याआधी सरत्या वर्षामध्ये म्हणजेच २०१६ या वर्षात ज्या व़्यक्तींनी तिला मदत केली आहे, सपोर्ट केलाय त्या सर्वांचे ती आभार मानत आहे. मागील वर्षातील सर्वत मेमरीज उर्मिलाने एकवटल्या असून ती सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखीली देत आहे. वर्षभरातील आठवणींना उजाळा देणारा एक सुंदर फोटो देखील तिने सोशलसाईट्सवर शेअर केला आहे. मागील वर्ष उर्मिलाला फारच छान गेले. तिने अहिल्याबाई होळकर सारखी दर्जेदार मालिका करुन आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. तर आता लवकरच नवीन वर्षात आपल्याला उर्मिलाचे दमदार चित्रपट देखील पाहायला मिळणार आहेत. क्रांती रेडकर, सुबोध भावे सोबत करार या चित्रपटामध्ये उर्मिलाची एक महत्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांचे अलौकिक जीवन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर बेतलेला विठा हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर येतोय. विठा चित्रपटात विठाबाई नारायणगांवकर यांची मध्यवर्ती भूमिका उर्मिलाने साकारली आहे. तिच्या सोबतच या चित्रपटात उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.