तीन जोडप्यांच्या आयुष्यातील घडणारे प्रसंग म्हणजे 'हुंटाश'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 16:15 IST2017-10-30T10:07:47+5:302017-10-30T16:15:41+5:30
प्रेक्षकांना भावणारी, मनमोकळी, दिलखुलास कॉमेडी याने ओतप्रोत भरलेला एक मराठी चित्रपट 'हुंटाश' हे नाव परिधान करून निखळ मनोरंजनाचे दालन ...
तीन जोडप्यांच्या आयुष्यातील घडणारे प्रसंग म्हणजे 'हुंटाश'
प रेक्षकांना भावणारी, मनमोकळी, दिलखुलास कॉमेडी याने ओतप्रोत भरलेला एक मराठी चित्रपट 'हुंटाश' हे नाव परिधान करून निखळ मनोरंजनाचे दालन प्रेक्षकांना खुलं करण्यात येत आहे.
चित्रपटाच्या नावावरून कल्पना आलीच असेलच कि हा विनोदी चित्रपट असणार, विनोदी असला तरीही तो हसतखेळत एक सामाजिक संदेश देवून जाईल. तेजराम-पार्वती, चिमण–हेमपुष्पा, आडकोजी-पंचफुला या तीन जोड्या आणि त्यांना साथ देणारी नवोदित जोडी सदु- सोना यांनी चित्रपटाची कथा फुलवली आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना या वळणाने ही विनोदी कथा आकार घेते. या तीनही जोडप्यांना आगळ्यावेगळ्या वेशभूषेत बघण्याचा अनुभव प्रेक्षकांना घेता येईल. थोडक्यात 'हुंटाश' मधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे यात शंकाच नाही. 'हुंटाश' चित्रपटाची निर्मिती अपर्णा प्रमोद व अच्चुत नावलेकर यांनी नक्षत्र मुव्हीजच्या बँनरखाली केली असून प्रमोद धामणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय अंकुश ठाकूर यांनी व त्यांनीच पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. संगीतकार प्रकाश प्रभाकर यांनी या चित्रपटातील वेगवेगळ्या जॉनरची पाच गाणी अवधूत गुप्ते, बेला शेंडे, शाल्मली कोलगाडे आणि जावेद अली या प्रसिद्ध पार्श्वगायकांकडून गाऊन घेतली आहेत. चित्रपटाच्या हटके कथानक प्रमाणे चित्रपटाची गाणी देखील तरुणाईला भुरळ पडणारी आहेत. गीते लिहिली आहेत प्रणित कुलकर्णी आणि अंकुश ठाकूर यांनी आणि छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे आशुतोष आपटे यांनी. या चित्रपटामध्ये किशोर नांदलस्कर, विजय चव्हाण, अरुण नलावडे, उषा नाडकर्णी, संजीवनी जाधव, नीला गोखले या अनुभवी कलाकारांबरोबर अंकुश ठाकूर आणि प्रियांका पुळेकर ही नवीन तरुण तडफदार जोडी सुद्धा दिसेल. न तास निखळ मनोरंजनाचा तडका मारलेला धमाल विनोदी चित्रपट 'हुंटाश' येत्या १० नोव्हेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाचा ट्रेलर बघून चित्रपटात दिसणारी ह्या कलाकारांच्या ह्याच वेगळ्या भूमिकेमुळे चित्रपटाची उत्सुकता तुमच्याप्रमाणे आम्हालाही आहे. त्यामुळे हि उत्सुकता आता लवकरच संपणार आहे.