नगरसेवक या चित्रपटासाठी उपेंद्र लिमये आणि नेहा पेंडसेची जमली जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 11:27 IST2017-03-21T05:57:40+5:302017-03-21T11:27:40+5:30
उपेंद्र लिमये आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळतो. त्याला त्याच्या जोगवा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितदेखील करण्यात आले आहे. ...

नगरसेवक या चित्रपटासाठी उपेंद्र लिमये आणि नेहा पेंडसेची जमली जोडी
उ ेंद्र लिमये आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळतो. त्याला त्याच्या जोगवा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितदेखील करण्यात आले आहे. देहबोली आणि शब्दांचे अचूक टायमिंग साधत त्याने केलेल्या अभिनयाची वेगळी झलक जश पिक्चर्स प्रस्तुत नगरसेवक या आगामी चित्रपटात पाहाता येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री नेहा पेंडसे त्याला नायिकेच्या भूमिकेत साथ देणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नेहाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती मे आय कम इन मॅडम या हिंदी मालिकेतदेखील झळकत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे सगळेच कौतुक करत आहे. नेहमी हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात वावरणारी नेहा नगरसेवक या चित्रपटात सोज्वळ भूमिकेतही तितकीच उठून दिसत आहे. आपल्या चोखंदळ भूमिकेसाठी ओळखले जाणारे उपेंद्र लिमये आणि नेहा पेंडसे नगरसेवक या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
नगरसेवक या चित्रपटाची निर्मिती शशिकांत चौधरी आणि जयश्री चौधरी यांनी केले असून दिपक कदम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. उपेंद्र लिमये आणि नेहा पेंडसे यांच्यासोबतच सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, सविता मालपेकर, विजय निकम, श्याम ठोंबरे, प्रियांका नागरे, त्रियोग मंत्री, अभिजीत कुलकर्णी आदी कलाकारांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. आजवर उपेंद्रने आशयप्रधान चित्रपटांमध्ये अतिशय सशक्त भूमिका साकारल्या आहेत. 31 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या नगरसेवक या चित्रपटात उपेंद्रने मल्हार या तडफदार तरुणाची भूमिका साकारली आहे. उपेंद्रची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही.