दिग्पाल लांजेकर, समीर खांडेकर, निखिल राऊत यांच्या मुख्य भूमिका असलेले ​चॅलेंज हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 12:47 IST2018-01-16T07:17:12+5:302018-01-16T12:47:12+5:30

चॅलेंज हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या नाटकात मराठी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ...

Dugpal Lanjekar, Sameer Khandekar and Nikhil Raut play the role of the Challenge as soon as the audience meets | दिग्पाल लांजेकर, समीर खांडेकर, निखिल राऊत यांच्या मुख्य भूमिका असलेले ​चॅलेंज हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

दिग्पाल लांजेकर, समीर खांडेकर, निखिल राऊत यांच्या मुख्य भूमिका असलेले ​चॅलेंज हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

लेंज हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या नाटकात मराठी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या नाटकाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला असून नाटकाच्या तालमीला लवकरच सुरुवात होणार आहे. दिग्पाल लांजेकरने ढाई अक्षर प्रेम के या नाटकाचे दिग्दर्शन केले असून हे नाटक काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. नाटक दिग्दर्शित करण्याची दिग्पालची ही पहिलीच वेळ असली तरी प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या नाटकाला मिळाला आहे. या नाटकाच्या यशानंतर आता दिग्पालने दिग्दर्शित केलेले दुसरे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकाचे नाव चॅलेंज असून या नाटकाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. 
चॅलेंज हे क्रांतिकारकांच्या मैत्रीचे युथफूल नाटक असून या नाटकाचे निर्माते दिनेश पेडणेकर आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे आहेत. मुक्ताने याआधी ढाई अक्षर प्रेम के, कोडमंत्र यांसारख्या नाटकाची निर्मिती केली आहे. चॅलेंज हे नवे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे दिनेश पेडणेकर यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितले आहे. त्यांनी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला या नाटकाच्या मुहूर्ताचे फोटो पोस्ट केले असून त्यासोबतच या नाटकाविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे की, अनामिका निर्मित साईसाक्षी प्रकाशित चॅलेंज या नाटकाचा मुहूर्त नुकताच दीनानाथ नाट्यगृहाच्या वाचनालयात संपन्न झाला. ढाई अक्षर प्रेम के नंतर मी आणि मुक्ता लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचे चॅलेंज हे दुसरे नाटक करणार आहोत. चॅलेंज मध्ये समीर खांडेकर, निखिल राऊत, मंदार कुलकर्णी, दीप्ती लेले, अभिजीत झुंजारराव, ज्ञानेश वाडेकर, शार्दूल आपटे, सुयश पुरोहित आणि स्वतः दिग्पाल लांजेकर महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. चॅलेंज नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत नुपूरा निफाडकर देणार आहे. प्रकाशयोजना राहुल जोगळेकर, सचिन दुनाखे यांची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीदिनीला म्हणजेच २६ फेब्रुवारी २०१८ला चॅलेंज नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे.

Also Read : स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेच्या फॅन्ससाठी खुशखबर

Web Title: Dugpal Lanjekar, Sameer Khandekar and Nikhil Raut play the role of the Challenge as soon as the audience meets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.