संतोष कोणाला म्हणतोय फक इट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 14:20 IST2016-12-05T14:20:05+5:302016-12-05T14:20:05+5:30
अभिनेता संतोष जुवेकर प्रेक्षकांना नेहमीच वेगळ््या अंदाजात त्याच्या प्रत्येक चित्रपटातच पहायला मिळतो. सर्व प्रकारचे रोल उत्तम करण्यात संतोषचा हात ...

संतोष कोणाला म्हणतोय फक इट?
अ िनेता संतोष जुवेकर प्रेक्षकांना नेहमीच वेगळ््या अंदाजात त्याच्या प्रत्येक चित्रपटातच पहायला मिळतो. सर्व प्रकारचे रोल उत्तम करण्यात संतोषचा हात कोणीच धरु शकत नाही. आत संतोष फक इट असे कोणाला म्हणतोय हे ऐकुन तुम्हाला आश्चर्य वाटले ना. पण हो संतोष कोणालाही फक इट म्हणत नाहीये. तर त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव, आश्चर्य फक इट... असे आहे. होय आजकाल एकदमच ट्रेंडी आणि हटके नावे चित्रपटाला देण्याची जणु काही क्रेझच निर्माण झाली आहे. तरुणाई ज्या प्रकारे कॉलेज कट्यांवरती भाषा वापरते तशीच काही आपल्याला आता हिंदी-मराठी चित्रपटांची नावे देखील दिसतात. आता युथला अपील होईल असा चित्रपट बनवायचा असेल तर तरुणाईला समजेल अशीच भाषा वापरायला हवी ना. म्हणुनच की काय सध्या वाय झेड, टिटिएमएम, एफयु यासारखे चित्रपट देखील मराठीमध्ये पाहायला मिळतात. अहो एवढेच काय तर आता अशाप्रकारची नावे अगदी बिनधास्तपणे चित्रपटांना दिली जात आहेत. संतोष देखील अशाच एका बॉलिवूड चित्रपटामध्ये काम करणार आहे. आश्चर्य फक इट असे नाव असलेल्या या चित्रपटामध्ये प्रियांका घोष ही अभिनेत्री आपल्याला पहायला मिळणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन समीत कक्कड यांनी केले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून या सिनेमाच्या सेटवर संतोष एकदमच धमाल मुडमध्ये पाहायला मिळत आहे. नुकताच संतोषचा या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या सिनेमाच्या नावावरुन तरी नक्कीच प्रेक्षकांमध्ये चित्रपटात काय असणार हे जाणुन घेण्याची उत्सुकता वाढली असणार यात काही शंकाच नाही.