सागरला करायचे छोटया पडदयावर काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 10:31 IST2016-12-06T10:31:05+5:302016-12-06T10:31:05+5:30

 वायझेड या चित्रपटातून अभिनेता सागर देशमुख प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच तो अनेक नाटकमधूनदेखील आपला अभिनय प्रेक्षकांपर्यत पोहोचवत असतो. आपल्या ...

Do you want to work on small screen? | सागरला करायचे छोटया पडदयावर काम?

सागरला करायचे छोटया पडदयावर काम?

 
ायझेड या चित्रपटातून अभिनेता सागर देशमुख प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच तो अनेक नाटकमधूनदेखील आपला अभिनय प्रेक्षकांपर्यत पोहोचवत असतो. आपल्या अभिनयाप्रमाणेच तो लिखाणाचीदेखील जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडताना दिसत आहे. नुकतेच त्याने शिल्लक हे नाटक लिहिले असल्याचे त्याने लोकमत सीएनएक्सला सांगितले. हे नाटक त्याने  एका राइटस ब्लॉक नावाचा उपक्रम आहे. या उपक्रमअंतर्गत शिल्लक हे नाटक लिहीले आहे. भारतातील अडचणी हा या नाटकाचा विषय होता. त्यासाठी माझी निवडदेखील झाली. तसेच माझ्या मनातदेखील हे नाटक फार दिवस रेंगाळत होते. मात्र शेवटी योगायोगाने या उपक्रमाच्या निमित्ताने ही परिस्थिती जुळून आली असल्याचे सागरने  सांगितले. तो सांगतो, या नाटकामध्ये एक भारतीय फॅमिली दाखविण्यात आली आहे. या फॅमिलीतील कर्ता माणूस म्हणजेच वडिलांना अचानक कंपनीत नोटीस देण्यात येते की, उदयापासून कामाला यायचे नाही. त्यावेळी त्या माणसाची व त्याच्या परिवाराचे काय होते ही परिस्थिती मांडणारे हे नाटक आहे. त्याचप्रमाणे सागरने पन्नासपेक्षा अधिक नाटक केले आहे. तरी ही  ज्यावेळी सागर रंगभूमीवर उभा असतो त्याचवेळी तो जास्त कर्न्फेटेबल असतो. त्यामुळे नाटक करताना  जास्त मजा येते. तसेच टेलिव्हिजन आणि चित्रपटाचे कॅमेराचे तंत्रज्ञान अदयापदेखील समजले नाहीत.  नाटकात जास्त काम केल्यामुळे या क्षेत्राचा जास्त अनुभव असला तरी हेच क्षेत्र माझ्यासाठी जास्त आव्हानात्मक आहे असेदेखील यावेळी सागर म्हणाला, मात्र आता वायझेड या पहिल्या चित्रपटानंतर सागरला छोटया पडदयावर येण्याचा मानस असल्याची अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. फक्त एका चांगल्या विषयाची वाट पाहत आहे. चांगली स्क्रीप्ट मिळाली तर नक्कीच मालिका व चित्रपट करण्याची करण्याची तयारी आहे. त्पाचप्रमाणे सध्या छोटया पडदयावर काम करण्याविषयी बोलणी असल्याचेदेखील सागरने सांगितले. चला तर पाहूयात  सागरची  व प्रेक्षकांची ही इच्छा कधी पूर्ण होते

Web Title: Do you want to work on small screen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.