कोवळ्या वयात प्रिया बापटनं या हिंदी सिनेमात साकारलेली भूमिका तुमच्या लक्षात आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 14:46 IST2017-09-01T09:16:50+5:302017-09-01T14:46:50+5:30
अभिनेत्री प्रिया बापट हिनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. झी मराठीवरील सारेगमपमध्ये सूत्रसंचालन करत ती घराघरात पोहचली. आनंदी ...
.jpg)
कोवळ्या वयात प्रिया बापटनं या हिंदी सिनेमात साकारलेली भूमिका तुमच्या लक्षात आहे का?
अ िनेत्री प्रिया बापट हिनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. झी मराठीवरील सारेगमपमध्ये सूत्रसंचालन करत ती घराघरात पोहचली. आनंदी आनंद, शुभंकरोती अशा टीव्ही मालिकांमधून प्रिया घराघरातील रसिकांची आवडती अभिनेत्री बनली. मराठी मालिकाच नाहीतर मराठी रंगभूमी, मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमातही प्रियानं आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकली. नवा गडी, नवा राज्य या नाटकात साकारलेल्या भूमिकेनं तिने रसिकांच्या मनात छाप पाडली. मराठी चित्रपटसृष्टीत विविध सिनेमांमधून तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र मराठीच नाही तर हिंदीतही प्रियानं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अगदी लहान वयात तिने हिंदीतल्या दिग्गज कलाकार आणि दिग्गज दिग्दर्शकासह काम केलं. तिने अभिनय केलेला हिंदी सिनेमा म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस. या सिनेमात प्रियानं छोटीशी भूमिका साकारली होती. भूमिका एकदम छोटी असली तरी त्या भूमिकेतूनही प्रियानं वेगळी छाप पाडली होती. आजही प्रियाची ही भूमिका रसिकांच्या लक्षात आहे. मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमात मुन्नाभाई संजय दत्तसह प्रिया झळकली होती. या सीनमध्ये प्रियानं प्रथम वर्षातील मेडिकल विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. संजय दत्त, बोमन इराणी यांच्यासह प्रियानं एक सीन दिला होता. तो सीन आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. डॉ. अस्थाना (बोमन इराणी) विद्यार्थ्यांना विचारतात की तुम्हाला डॉक्टर का व्हायचं आहे. त्यावेळी मी लोकांशी आपुलकीने वागते आणि त्यांच्याशी मैत्री करुन एक चांगली डॉक्टर बनू शकते असं उत्तर त्यावेळी प्रिया देते. हा छोटाच मात्र महत्त्वाचा असलेला सीन प्रियानं मोठ्या खुबीने साकारला होता. 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमाच्या यशानंतर प्रिया राजू हिरानी यांच्या लगे रहो मुन्नाभाई या सिनेमातही झळकली होती. या भूमिकांनी प्रियांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवलं. यानंतर विविध मराठी सिनेमांमधून प्रियानं रसिकांची मनं जिंकली. काकस्पर्श, हॅपी जर्नी आणि वजनदार अशा सिनेमातील तिच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.