फोटोतील या मुलीला ओळखलंत का?, 'आयत्या घरात घरोबा'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत केले होते पदार्पण; आता दिसते अशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 06:00 AM2023-04-04T06:00:00+5:302023-04-04T06:00:00+5:30

या अभिनेत्रीचा नवरा देखील हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आहे.

Do you recognize this girl in the photo?, she made her debut in Marathi cine industry with 'Ayatya Gharta Gharoba'; Now it looks like this! | फोटोतील या मुलीला ओळखलंत का?, 'आयत्या घरात घरोबा'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत केले होते पदार्पण; आता दिसते अशी!

फोटोतील या मुलीला ओळखलंत का?, 'आयत्या घरात घरोबा'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत केले होते पदार्पण; आता दिसते अशी!

googlenewsNext

बऱ्याचदा कलाकार त्यांच्या बालपणींच्या आठवणीत रमतात आणि त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसतात. दरम्यान आणखी एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो. या फ्रॉकमधील मुलीला ओळखलंत का? ही चिमुरडी आज प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने मराठी चित्रपटसृष्टीत 'आयत्या घरात घरोबा'मधून पदार्पण केले होते. ही अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी सचदेव (Rajeshwari Sachdev).

आयत्या घरात घरोबा सिनेमात अभिनेत्री राजेश्वरी सचदेवने कानन म्हणजेच सचिन पिळगावकर यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. जी नंतर लक्ष्मिकांत बेर्डेच्या प्रेमात पडते. राजेश्वरी सचदेव ही थिएटर आर्टिस्ट, गायिका तसेच नृत्यांगना आहे. आयत्या घरात घरोबा हा तिचा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे.

या चित्रपटानंतर श्याम बेनेगल यांनी ‘सुरज का सांतवा घोडा’ चित्रपटात तिला काम दिले होते. त्यानंतर सरदारी बेगम, हरी भरी, द फरगॉटन हिरो, वेलकम तू सज्जनपूर अशा बॉलिवूड चित्रपटातून ती झळकली. राजेश्वरी एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे. तिने अनेक हिंदी कार्यक्रमांत संचालन केले आहे.

राजेश्वरी सचदेवचा नवरादेखील अभिनेता आहे, ज्याचे नाव आहे वरुण वडोला. वरुण वडोला हा हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आहे. ये है मुंबई मेरी जान , कोशीश एक आशा, सोनी महिवाल, अस्तित्व एक प्रेम कहाणी अशा अनेक दर्जेदार मालिकेतून कधी विनोदी भूमिका तर कधी गंभीर भूमिका त्याने निभावल्या आहेत.

Web Title: Do you recognize this girl in the photo?, she made her debut in Marathi cine industry with 'Ayatya Gharta Gharoba'; Now it looks like this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.