'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये झळकलेल्या या फ्रॉकमधल्या क्युट मुलीला ओळखलंत का?, ही गायिका, अभिनेत्री बनलीय सगळ्यांची क्रश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 11:47 AM2022-05-06T11:47:46+5:302022-05-06T11:48:24+5:30

फोटोत पर्पल रंगाच्या फ्रॉकमधील ही गोंडस मुलीने आता गायनासोबत अभिनयातही आपली छाप उमटवली आहे.

Do you know the cute girl in this frock who starred in 'Saregampu Little Champs'? | 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये झळकलेल्या या फ्रॉकमधल्या क्युट मुलीला ओळखलंत का?, ही गायिका, अभिनेत्री बनलीय सगळ्यांची क्रश

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये झळकलेल्या या फ्रॉकमधल्या क्युट मुलीला ओळखलंत का?, ही गायिका, अभिनेत्री बनलीय सगळ्यांची क्रश

googlenewsNext

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या सिंगिंग रिएलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या छोट्या कलाकारांनी आपल्या गायन कौशल्याने रसिकांच्या मनावर चांगलीच छाप उमटवली. त्यातील काही जण आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. त्यातीलच एक बालकलाकाराच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत पर्पल रंगाच्या फ्रॉकमधील या बालकलाकाराला तुम्ही ओळखलंत का?, नाही ना..ही बालकलाकार दुसरी तिसरी कोणी नसून ती आर्या आंबेकर (Arya Ambekar) आहे. गायिका आर्या आंबेकर हिने १२ वर्षांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्स(Sa Re Ga Ma Pa L'il Champs)मध्ये सहभाग घेतला होता. या शोमधून तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आता आर्या आंबेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीदेखील आहे.

सध्या सोशल मीडियावर आर्या आंबेकर(Arya Ambekar)च्या बालपणीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत तिने पर्पल रंगाचा फ्रॉक परिधान केलेला दिसतो आहे. तिच्यासोबत या फोटोत तिच्या बाजूला गायिका प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे पाहायला मिळत आहेत. या तिघांच्या या बालपणीच्या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

आर्या आंबेकरला गायनाचे बाळकडू तिच्या घरातूनच मिळाले. तिने वयाच्या साडेपाच वर्षांपासून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आर्याने आतापर्यंत अनेक सिनेमा आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्या सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. सध्या आर्या सगळ्यांची क्रश बनली आहे. तिच्या सौंदर्यावर, सुरेल आवाजावर सगळेच फिदा आहेत. तिचा सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे.

गायनासोबतच अभिनय क्षेत्रातही आर्याने नाव कमावले आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. विविध मालिकांसाठीही तिने गाणी गायली आहेत. तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील आर्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.

Web Title: Do you know the cute girl in this frock who starred in 'Saregampu Little Champs'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.