सखीने चाहत्यांना काय दिले दिवाळी गिफ्ट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 17:28 IST2016-10-29T13:28:35+5:302016-10-29T17:28:22+5:30

सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे सर्वजणच फोटोच्या आहारी गेले आहेत. मॉलमध्ये जा, थियटरमध्ये जा किंवा अगदी हॉटेलमध्येही लोकांचे हातात ...

Diwali gift to Sakhi fans? | सखीने चाहत्यांना काय दिले दिवाळी गिफ्ट ?

सखीने चाहत्यांना काय दिले दिवाळी गिफ्ट ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे सर्वजणच फोटोच्या आहारी गेले आहेत. मॉलमध्ये जा, थियटरमध्ये जा किंवा अगदी हॉटेलमध्येही लोकांचे हातात फोन घेऊन फोटोशूट हे चालूच असते. मात्र कलाकारांचे फोटोशूट हे वेगळे असते. सिनेमा जगात किंवा मॉडेलिंग फोटोशूटला अत्यंत महत्व असते. कारण त्यांना वेगवेगळ्या लुकमध्ये सतत अपडेट राहाणे गरजेचे असते.  थोडक्यात फोटोशूट हा कलाकारांच्या कामाचा भाग असतो. सध्या सर्वच कलाकार मोठया प्रमाणात फोटोशूट करताना पाहायला मिळत आहे. आता यामध्ये प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सखी गोखले हिने देखील स्वत:चे फोटोशूट केले आहे. सखीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. फोटोग्राफर तेजस नेहरूरकर याने हे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये सखीचा एकदम हटके अंदाज दिसत आहे. सखीने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील तिची भूमिका एकदम सोज्वळ होती. त्यामुळे तिचा हा हटके लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या फोटोला सोशल मीडियावर भरपूर लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच मालिकेनंतर सखी नाटक आणि चित्रपटात व्यग्र आहे. सध्या तिचे अमर स्टुडिओ हे नाटक चर्चेत आहे. तसेच सखी चित्रपटात येण्यास देखील सज्ज झाली आहे. ती तिच्या पहिल्या चित्रपटात अभिनेता सिध्दार्थ चांदेकर याच्यासोबत पाहायला मिळणार आहे. पण सखीचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच दिवाळी सरप्राइज असणार आहे.



 

Web Title: Diwali gift to Sakhi fans?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.