Video: दिवाळीत असा बनवा झटपटीत पोह्यांचा खमंग चिवडा, प्रिया बापटने शेअर केली आईची रेसिपी

By कोमल खांबे | Updated: October 16, 2025 11:12 IST2025-10-16T11:12:20+5:302025-10-16T11:12:51+5:30

दिवाळीतील फराळाच्या पदार्थांची प्रत्येकाचीच खास रेसिपी असते. मराठी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या आईची पोह्यांच्या चिवड्याची खास रेसिपी शेअर केली आहे

diwali 2025 priya bapat shared her mother special poha chivada recipe | Video: दिवाळीत असा बनवा झटपटीत पोह्यांचा खमंग चिवडा, प्रिया बापटने शेअर केली आईची रेसिपी

Video: दिवाळीत असा बनवा झटपटीत पोह्यांचा खमंग चिवडा, प्रिया बापटने शेअर केली आईची रेसिपी

सर्वत्र रोषणाई करणारी आणि आनंद पसरवणारी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सगळीकडेच दिवाळीची जय्यत तयारी होताना दिसते आहे. घरोघरी फराळाची लगबग सुरू आहे. दिवाळीतील फराळाच्या पदार्थांची प्रत्येकाचीच खास रेसिपी असते. मराठी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या आईची पोह्यांच्या चिवड्याची खास रेसिपी शेअर केली आहे. 

दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतात. कित्येक कलाकार मोठ्या आवडीने घरच्या घरीच फराळ आणि कंदील बनवतात. प्रिया बापटच्या घरीही दिवाळीची तयारी सुरू आहे. प्रियाने नुकतंच पोह्यांचा चिवडा बनवला. खास आईची रेसिपी ट्राय करून प्रियाने हा चिवडा बनवला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांसोबत पोह्यांच्या चिवड्याची रेसिपीही शेअर केली आहे. व्हिडीओत दिसतंय की प्रिया किचनमध्ये पोह्यांचा चिवडा बनवत आहे. 


आधी तिने पोहे थोडेसे भाजून घेतले आहेत. त्यानंतर चण्याची डाळ, ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे तेलातून तळून घेतले आहेत. भाजलेल्या पोह्यांमध्ये मीठ आणि पिठी साखर घातल्याचं प्रियाने सांगितलं. त्यानंतर प्रियाने तेलात तळून घेतलेली डाळ, काजू बदाम आणि शेंगदाणे पोह्यांमध्ये मिक्स केले. मग कढईत तिने मोहरी, कडीपत्ता, मिरच्या, हिंग, हळद आणि धनेपूड याची फोडणी दिली. त्यानंतर पोहे आणि इतर मिश्रण तिने कढईत टाकून ते एकत्रित केल्याचं दिसत आहे. प्रियाच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनीही ही रेसिपी ट्राय करणार असल्याचं म्हटलं आहे. 

Web Title : प्रिया बापट ने साझा की माँ की झटपट दिवाली पोहा चिवड़ा रेसिपी।

Web Summary : अभिनेत्री प्रिया बापट ने अपनी माँ की झटपट दिवाली पोहा चिवड़ा रेसिपी साझा की। दाल, नट्स और मूंगफली को तला। राई, करी पत्ता, मिर्च, हींग, हल्दी और धनिया पाउडर का तड़का लगाया। प्रशंसक इसे आज़माने के लिए उत्साहित हैं।

Web Title : Priya Bapat shares mom's quick Diwali poha chivda recipe.

Web Summary : Actress Priya Bapat shares her mother's quick Diwali poha chivda recipe. She fries lentils, nuts, and peanuts. Seasoning includes mustard seeds, curry leaves, chilies, asafoetida, turmeric, and coriander powder. Fans are excited to try it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.