बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 13:20 IST2017-01-21T07:47:11+5:302017-01-21T13:20:48+5:30

सध्या बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असणाºया ...

Display the poster of this movie to see what is done | बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

्या बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असणाºया या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाचा लागली आहे. तसेच या चित्रपटात गड, किल्ले यांचे कसे संवर्धन करायचे यासंबंधीचा जनजागृती करण्याचा संदेश प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे असे वाटते. नुकतेच या चित्रपटाचा पोस्टर दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सोशलमीडियावर प्रदर्शित केले आहे. त्याच्या या पोस्टरबरोबरच हेमंतने एक पोस्ट ही शेअर केली आहे. तो आपल्या या पोस्टच्या माध्यमातून सांगतो, ज्या नजरेतुन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य पाहिलं ती नजर परत आणुया... आपल्या महाराष्ट्राचं वैभव परत आणुया! महाराज आपल्या सोबत आहेत... त्याच्या या पोस्टला आणि पोस्टरला सोशलमीडियावर भरभरून पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच अप्रतिम पोस्टर म्हणत या पोस्टरचे कौतुकदेखील करण्यात आले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना जितेंद्र जोशी, अक्षय टंकसाळे, अनिकेत विश्वासराव, रसिका सुनिल, पर्ण पेठे आणि नेहा जोशी हे कलाकार दिसणार आहेत. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, गणराज प्रॉडक्शन प्रस्तुत हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची लिखाण आणि दिग्दर्शनाची जबाबदारी हेमंत ढोमे याने पार पाडली आहे. ३ फ्रेबुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे.  हेमंत ढोमे याने यापूर्वी  क्षणभर विश्रांती, पोस्टर गर्ल, आॅनलाइन बिनलाइन, सतरंगी रे अशा अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयानेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. 




 

Web Title: Display the poster of this movie to see what is done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.