नावातच वेगळेपण असल्याने नक्की डिस्को आहे तरी आहे तरी काय याची उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. ...
डिस्को सन्याचे टिझर आऊट
/> नावातच वेगळेपण असल्याने नक्की डिस्को आहे तरी आहे तरी काय याची उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. परंतू या क्युरिओसिटीवर आता पुर्णविराम लागला असुन डिस्को सन्याचे टिझर आऊट झाले आहे. या चित्रपटामध्ये थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेला पार्थ भालेराव झळकणार आहे. रावडी लुकमधील पार्थ भालेरावचा एकदमच दबंग अंदाज या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे. नाचीज को सन्या केहेते है... डिस्को सन्या आशा प्रकारचे एकजम हटके डायलॉग पार्थच्या तोंडुन प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. आता नक्कीच या चित्रपटासाठी पार्थचे चाहते उत्सुक असतील यात काही शंका नाही.