डिस्को सन्या या टीमची लोकमत आॅफीसला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 15:40 IST2016-08-05T10:10:38+5:302016-08-05T15:40:38+5:30

 नाचीज को सन्या कहते है...डिस्को सन्या अशा तुफान डायलॉगबाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा डिस्को सन्या हा चित्रपट ५ आॅगस्ट (आज) ...

DISCO SANYA: The team visited the Office of the Lokmat | डिस्को सन्या या टीमची लोकमत आॅफीसला भेट

डिस्को सन्या या टीमची लोकमत आॅफीसला भेट

 
ाचीज को सन्या कहते है...डिस्को सन्या अशा तुफान डायलॉगबाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा डिस्को सन्या हा चित्रपट ५ आॅगस्ट (आज) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. एका गर्विष्ठ बिझनेसमॅन आणि सिग्नल वर विविध वस्त विकणारा माणुसकी जपणारा एक चिमुरडा यांचा मजेशीर संघर्ष आणि संघर्षातून दोघांच्या आयुष्यात घडलेले बदल अशी या चित्रपटाची हटके कथा डिस्को सन्या या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे दिग्दर्शक नियाज मुजावर यांनी लोकमत आॅफीसला दिलेल्या भेटी दरम्यान सांगितले. यावेळी या चित्रपटाचे निर्माते सचिन पुरोहित व अभिजीत कवठाळकरदेखील उपस्थित होेते. तर कलाकारांमध्ये पार्थ भालेराव, संजय खापरे,अशोककुमार भट्टाचार्य, रिषभ पुरोहित आदी उपस्थित होते. 
     निर्माते सचिन पुरोहीत म्हणाले, गेली आठ ते दहा वर्ष अनाथ व वंचित मुलांसाठी मी व माझे कुटुंब सामाजिक कार्य करत आहोत. अशा या वंचित मुलांची जीवन जगण्याची उमेद आहे ती या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. या मुलांची जीवन जगण्याची उमेद पाहून मला ही कथा सुचली. मी, सचिन व नियाज यांना ही कथा  ऐकवली. त्यानंतर लगेचच त्यांनीदेखील कथेला होकार दिला. 
      चित्रपटातील संगीताच्या बाजाबद्दल आपल्या कल्पना नेमक्या काय होत्या हे सांगताना निर्माते अभिजीत कवटाळकर म्हणाले, या चित्रपटातील सगळी गाणी ही कथेला पुढे घेऊन जाणारी आहे. ही गाणी प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी असून या गाण्याचे प्रत्येक गाण्यांचे बीटस, चाल, शब्द रचना हे सर्व काही अप्रतिम झाले आहे. 
       हरी विठ्ठला अल्ला हू अकबर हे गाणं देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच इतर गाणीदेखील खूप उत्तम आहेत. अवधूत गुप्ते, नंदेश उमप व आदर्श शिंदे यांसारख्या प्रसिध्द गायकांनी गाणी गायली आहे.  या चित्रपटाद्वारे बॉलिवुड गायक शबाब सबरी यांचे मराठीत पदापर्ण झाले आहे. 



 

Web Title: DISCO SANYA: The team visited the Office of the Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.