बाबुली मिस्त्रींचा जलवा! 'दशावतार'मधील 'मत्स्यावतार'मागचे कष्ट दिलीप प्रभावळकरांनी केले उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 11:29 IST2025-10-11T11:28:47+5:302025-10-11T11:29:44+5:30
Dilip Prabhavalkar on Dashavatar Movie : कोकणातील पारंपारिक दशावतारी लोककला आणि निसर्ग-संस्कृतीच्या रक्षणाच्या संघर्षावर आधारीत असलेला 'दशावतार' सिनेमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. दरम्यान आता दिलीप प्रभावळकर यांनी दशावतारातील मत्स्यावतारावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

बाबुली मिस्त्रींचा जलवा! 'दशावतार'मधील 'मत्स्यावतार'मागचे कष्ट दिलीप प्रभावळकरांनी केले उघड
कोकणातील पारंपारिक दशावतारी लोककला आणि निसर्ग-संस्कृतीच्या रक्षणाच्या संघर्षावर आधारीत असलेला 'दशावतार' सिनेमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. १२ सप्टेंबर रोजी रिलीज झालेला हा सिनेमा पाचव्या आठवड्यातही थिएटरमध्ये हिंदी आणि साउथच्या सिनेमांपुढे तग धरून कायम आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेला ज्येष्ठ नट बाबुली मिस्त्री प्रेक्षकांना खूपच भावले. त्यांच्या कामाचं खूप कौतुक झाले. दरम्यान आता दिलीप प्रभावळकर यांनी दशावतारातील मत्स्यावतारावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
दिलीप प्रभावळकर यांनी 'दशावतार' सिनेमातील त्यांच्या मत्स्यावतारातील शूटिंगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी लिहिले की, ''दशावतारातील 'मत्स्यावतार', एक दिव्य! 'दशावतार' चित्रपटातला माझा सगळ्यात गाजत असलेला अवतार म्हणजे, ‘मत्स्यावतार’! निळ्या रंगातील चमकदार रंगभूषा आणि वेशभूषा… त्यासाठी सगळ्या टिमने तासंतास घेतलेले कष्ट… कुडकुडत्या थंडीत पाण्याखाली जाऊन केलेले चित्रीकरण आणि त्या साऱ्याचे फलित म्हणजे चित्रपटगृहात प्रेक्षकांनी ‘मत्स्यावताराच्या’ प्रसंगाला दिलेली दाद! अजूनही तुम्ही ‘दशावतार’ पाहिला नसाल तर जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तो नक्की पहा! चुकवू नये असं काहितरी सिनेमागृहात पाचव्या आठवड्यातही सुरु आहे!''
'दशावतार' सिनेमा पाचव्या आठवड्यातही थिएटरमध्ये धुमाकूळ घालतो आहे. सिनेमाच्या कमाईवर नजर टाकली तर, या सिनेमाने २५ कोटींहून अधिकची कमाई केलीय. जगभरात ‘दशावतार’ सिनेमाने २६.४३ कोटींची कमाई केली आहे. सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित दशावतार चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह सिद्धार्थ मेनन,भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, विनोद तावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.