दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 18:24 IST2025-08-09T18:22:55+5:302025-08-09T18:24:16+5:30
Dilip Prabhavalkar : 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमात दिलीप प्रभावळकर यांनी महात्मा गांधीजींची भूमिका केली होती. या भूमिकेचं खूप कौतुक झाले होते.

दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते उत्तम लेखकही आहेत. त्यांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. 'लगे रहो मुन्नाभाई' (Lage Raho Munnabhai) सिनेमात दिलीप प्रभावळकर यांनी महात्मा गांधीजींची भूमिका केली होती. ही भूमिका त्यांनी खूप छान साकारली आहे. त्यांना त्या गेटअपमध्ये ओळखता आलेच नाही. दरम्यान ही भूमिका त्यांना कशी मिळाली, याबद्दल दिलीप प्रभावळकर यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये सांगितले.
दिलीप प्रभावळकर म्हणाले की, ''राजकुमार हिराणीला का वाटलं की मी गांधी करेन म्हणून? मी गेलो होतो वेगळ्याच भूमिकेसाठी तिकडे. त्यांनी मला बोलवलं होतं. 'लगे रहो मुन्नाबाई'मध्ये विद्या बालनच्या गांधी भक्त असलेल्या आजोबांचा वृद्धाश्रम असते. सेकंड इनिंग होम तर त्याच्यात जे चक्रम जे असतात त्यातल्या एकाचा रोल मला दिला होता. त्यावेळेला मी त्या वयाचा नव्हतो. तर त्यांनी सांगितलं तू करशील का ही भूमिका. तर म्हटलं करेन ना. मला आवडेल करायला. मला त्याची कथा आवडली होती. त्याची स्टोरी गंमतीशीर होती.''
ते पुढे म्हणाले की, ''एक डॉनसारखा माणूस गांधींना एकत्र आणणं म्हणजे त्याच्यावर इन्फ्लुयन्स होतो गांधींचा तर तो माझ्याकडे बघत बसला होता बराच वेळ. हा का बघतोय तर तो म्हणाला की Let me try you for Gandhi's role. म्हटलं मी गांधी आणि मग त्यांनी ट्रायल घेतली आणि बऱ्याच बॉलिवूडमधील कलाकारांना गांधीजींची भूमिका करण्यामध्ये इंटरेस्ट होता. त्यांनी मला ट्रायल सांगितली. ट्रायल घेतली. हँडीकॅमवर शूट केलं मी म्हंटलं ठीक आहे. मी विसरून गेलो म्हटलं बऱ्याचं लोकांना इंटरेस्ट आहे. त्यांनी मला नंतर फोन केला आणि म्हटलं की तुमचं रिझल्ट्स फॅंटस्टिक आहेत. तू गांधीजींची भूमिका करतो आहेस. म्हणून तो पहिला कॅरेक्टर रोल केला. सांगायचा मुद्दा की या दिग्दर्शकांना म्हणजे माझा माझ्यावर आहे त्याच्यापेक्षा जास्त विश्वास त्या दिग्दर्शकांचा माझ्या टॅलेंटवर होता.''