युट्युब गर्ल मिथिला पालकरचा हा 'अण्णा के जैसा चष्मा लगा के' व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 13:18 IST2017-10-04T07:48:48+5:302017-10-04T13:18:48+5:30

मिथिला बॉलिवूडमधील सध्याच्या एका आघाडीच्या अभिनेत्यासोबत चित्रपटात काम करणार आहे. तिनेच ही बातमी सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना दिली होती. लाइफ इन मेट्रो, पिकू यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिकांध्ये झळकलेल्या इरफान खानसोबत ती चित्रपटात झळकणार आहे.

Did you watch video of Mithila Palkar's 'Anna-like glasses' video? | युट्युब गर्ल मिथिला पालकरचा हा 'अण्णा के जैसा चष्मा लगा के' व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

युट्युब गर्ल मिथिला पालकरचा हा 'अण्णा के जैसा चष्मा लगा के' व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

'
;चेन्नई एक्सप्रेस' या सिनेमातील 'अण्णा के जैसा चष्मा लगा के', लुँगी डान्स हे गाणं  गाणं बरंच हिट ठरलं होतं. आजही या गाण्याची जादू काही कमी झालेली नाही. रॅपर आणि गायक यो यो हनी सिंहने या गाण्याला वेगळा टच दिला होता. सध्याची गाणी रिलीज होताच लोकप्रिय ठरतात. या गाण्याची काही काळ रसिकांवर जादू पाहायला मिळते. मात्र कालांतराने ही गाणी रसिक विसरुन जातात. सध्याची गाणी तात्पुरती हिट होऊन विस्मृतीत जात असल्याचेही ऐकायला मिळतं. ब-याचदा सुपरहिट गाणी सांगताना जुन्या जमान्यातील गाणी किंवा नव्वदीच्या दशकातील गाण्यांचा दाखला दिला जातो. मात्र अभिनेत्री दीपिका पादुकोण  आणि अभिनेता  शाहरूख खान  यांच्यावर चित्रीत करण्यात ''लुँगी डान्स'' हे गाणं अपवाद ठरलं आहे. या गाण्याने लहानांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सा-यांनाच गाण्यावर थिरकायला भाग पाडलं होतं. लग्नसमारंभात होणा-या संगीत सेरेमनीमध्ये तर लुँगी डान्स झाल्याशिवाय सोहळा पूर्ण होत नव्हते.चेन्नई एक्सप्रेस सिनेमातले हे  चार्टबस्टरवर हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे. या गाण्याला मिळालेले यश पाहात या गाण्यावर अनेक पुरस्कारांचाही वर्षाव झाला आहे.  आजही  या गाण्याची जादू कायम असल्याचे पाहायला मिळतंय. अभिनेता इरफान खान, मिथिला पालकर आणि दलकीर सलमान यांच्यावर   काला चष्मा गाण्याने मोहिनी घातल्याचे पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वीच मिथिलाने याच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.या व्हिडीओत तिघांनीही काळा चष्मा परिधान करत हा व्हिडीओ शूट केला आहे.व्हीडिओत हे तिघेही शाहरूख खान- दीपिका पादुकोणच्या 'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमातील लुंगी डान्स गाण्यामधली गॉगल लावलेली एक डान्स स्टेप करताना दिसत आहेत. मिथिलाने या व्हीडिओला 'अण्णा के जैसा चष्मा लगा के... ', अशी कॅप्शन दिली आहे. 'अण्णा के जैसा चष्मा लगाके' मिथला पालकरचा  हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच लोकप्रिय ठरतो आहे. फॅन्सकडून या व्हिडीओला अनेक कमेंट्स आणि लाईक्सही मिळत आहेत. 

Also Read:जेव्हा 'लुंगी डान्स' गाण्यावर थिरकला विन डिझेल


 

मिथिलाला युट्युब गर्ल आणि इंटरनेट सेन्सेशन म्हटले जाते. तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात इमरान खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती..तसेच 'गर्ल इन द सिटी' ही मिथिला पालकरची वेबसिरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.तसेच 'मुरांबा' हा मिथीलाचा पहिला मराठी सिनेमा होता. अमेय वाघ आणि मिथिलाची केमिस्ट्रीही रसिकांना भावली होती.सध्या मिथिला बॉलिवूड मध्ये काम करण्यास ती खूप उत्सुक आहे.मिथिला बॉलिवूडमधील सध्याच्या एका आघाडीच्या अभिनेत्यासोबत चित्रपटात काम करणार आहे. तिनेच ही बातमी सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना दिली  होती. लाइफ इन मेट्रो, पिकू यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिकांध्ये झळकलेल्या इरफान खानसोबत ती चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात डल्क्वीर सलमानदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. डल्क्वीर सलमान प्रसिद्ध मल्याळम अभिनेता असून या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाची रॉनी स्क्रूवाला निर्मिती करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश खुराणा करत आहे. आकाशने याआधी काही चित्रपटांसाठी लेखन केले आहे. या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे. ये जवानी है दिवानी या चित्रपटाचे लेखक हुसैन दलाल यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. 

Web Title: Did you watch video of Mithila Palkar's 'Anna-like glasses' video?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.