करण जोहरसोबत हा मराठमोळा दिग्दर्शक करणार काम, म्हणाला - 'ज्या माणसाबद्दल फक्त ऐकून होतो...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 03:58 PM2022-05-26T15:58:24+5:302022-05-26T18:38:19+5:30

बॉलिवूडमधला यशस्वी दिग्दर्शक-निर्माता करण जोहर सोबत काम करण हे अनेकांचं स्वप्न असतं.

Did you know this marathi director will work with Karan Johar, | करण जोहरसोबत हा मराठमोळा दिग्दर्शक करणार काम, म्हणाला - 'ज्या माणसाबद्दल फक्त ऐकून होतो...'

करण जोहरसोबत हा मराठमोळा दिग्दर्शक करणार काम, म्हणाला - 'ज्या माणसाबद्दल फक्त ऐकून होतो...'

googlenewsNext

बॉलिवूडमधला यशस्वी दिग्दर्शक-निर्माता करण जोहर सोबत काम करण हे अनेकांचं स्वप्न असतं. फक्त अभिनेता-अभिनेत्री नाही तर अनेक दिग्दर्शक तसेच टेक्निकल टीममधील तंत्रज्ञांना देखील त्याच्यासोबत काम करण्याची उस्तुकता असते. अशीच करणसोबत काम करण्याची सुवर्णसंधी एका मराठमोळ्या दिग्दर्शकाला मिळालीये...सोलापूरचा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकर आता करण जोहरसोबत काम करणार आहे.

अक्षयने करण जोहरच्या 5० व्या वाढदिवसानिमित्तानं केलेल्या एका खास पोस्टमध्ये हा खुलासा केलाय...त्याने लिहिलंय की, ज्या माणसाबद्दल फक्त ऐकून होतो लहानपणापासून कुछ कुछ होता है अगणित वेळा बघितला होता.देशातल्या एवढ्या मोठ्या बॉलिवूड नामक प्रकरणाचा खरा बादशहा जर कोण असेल तर तो हा माणूस . मला कधीच वाटलं न्हवतं मी करण जोहर च्या धर्मा प्रोडक्शन सोबत काम करेल . आणि हे स्वप्न पण बघण्याचं काही कारण न्हवतं. पण काही स्वप्नं आपल्या नकळत आपण मनाशी बाळगत असतो . स्वतः दिगदर्शक असलेल्या स्वतःच्या कंपनीत शेकडो नव्या फिल्ममेकर ला संधी देणारा हा माणूस अनेक तरुण फिल्म मेकर ला उभं करतोय.

अक्षयने करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली ही  पोस्ट यामुळे आता चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत अक्षयवर कौतुकाचा वर्षाव केलाय... अक्षयला आपण उदाहरणार्थ नेमाडे, त्रिज्या, स्थलपुराण या सिनेमांसाठी ओळखतो. वेगळ्या धाटणीच्या सिनेमांच्या माध्यमातून अक्षयने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केलीये..
 

Web Title: Did you know this marathi director will work with Karan Johar,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.