​सैराटमधील झिंगाटचे आफ्रिकन व्हर्जन तुम्ही ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:14 IST2017-09-19T08:43:18+5:302017-09-19T14:14:43+5:30

​सैराटमधील झिंगाटचे आफ्रिकन व्हर्जन नुकतेच रसिकांच्या भेटीस आले आहे. या गाण्याला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

Did you hear African variance of Zaragh in Serrat? | ​सैराटमधील झिंगाटचे आफ्रिकन व्हर्जन तुम्ही ऐकले का?

​सैराटमधील झिंगाटचे आफ्रिकन व्हर्जन तुम्ही ऐकले का?

राट हा चित्रपट प्रदर्शित होऊन वर्षं उलटले असले तरी या चित्रपटाची कथा, चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. मराठी चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त कमाई करणारा तो चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील गाणी तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या चित्रपटातील गाण्यांसाठी अजय-अतुल या जोडगोळीचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील झिंगाट गाण्याने तर सगळ्यांना वेड लावले होते. 
झिंगाट हे गाणे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोकांनी देखील डोक्यावर घेतले होते. हे गाणे केवळ भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे. कोणत्याही समारंभात, डिजेमध्ये प्रेक्षकांना आपल्याला हेच गाणे ऐकायला मिळते. या गाण्यावर तरुणाईला थिरकताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. या गाण्याची क्रेझ आजही थोडी देखील कमी झालेली नाही. हे गाणे आता प्रेक्षकांना एका वेगळ्या भाषेत ऐकायला मिळणार आहे. यापूर्वी अजय-अतुल यांच्या झिंगाट गाण्यावर रशियन लोकांनी केलेल्या डान्सचा व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला होता.
झिंगाट या गाण्याचे आफ्रिकन व्हर्जन नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून हे गाणे नायजेरियन तरुण सॅम्युअल सिंगने आपल्या अंदाजात गायले आहे. सॅम्युअल २०१० मध्ये कॅन्सरच्या उपचारांसाठी भारतात आला होता. त्यानंतर तो भारताच्या प्रेमात पडला. त्याला इथले म्युझिक खूपच आवडले होते. भारतातील संगीत हे सर्व देशातील संगीतापेक्षा खूप चांगले असल्याचे त्याचे म्हणणे आहे. यापूर्वी त्याने भोजपुरी गाणे ‘लॉलीपॉप लगेलू’चे देखील आफ्रिकन व्हर्जन बनवले होते. या गाण्याला रसिकांची चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. 
सॅम्युअलच्या या गाण्यांमुळे त्याला सोशल मीडियावर चांगलेच फॉलॉव्हिंग आहे. त्याचे फेसबुकला पेज असून या पेजला हजारोने लोक फॉलो करतात. सॅम्युअलने झिंगाटचे हे आफ्रिकन व्हर्जन सोशल मीडियावर पोस्ट करून काहीच दिवस झाले आहेत. त्याचे हे गाणे फेसबुक आणि यूट्यूबवर हजारो लोकांनी आतापर्यंत पाहिले आहे. तसेच हजारोहून अनेक लोकांनी हे गाणे शेअर केले आहे. तसेच अनेकांनी या गाण्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 



Also Read : ​सोशल मीडियावर सैराट फेम आकाश ठोसरच्या नावाने फसवणूक

Web Title: Did you hear African variance of Zaragh in Serrat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.