दिप्ती देवी आणि सौरभ गोखले एकत्रित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 11:12 IST2016-12-30T11:12:53+5:302016-12-30T11:12:53+5:30
प्रेक्षकांचे लाडके कलाकार अभिनेत्री दिप्ती देवी आणि सौरभ गोखले हे लवकरच एका आगामी चित्रपटात एकत्रित पाहायला मिळणार असल्याचे समजत ...

दिप्ती देवी आणि सौरभ गोखले एकत्रित?
प रेक्षकांचे लाडके कलाकार अभिनेत्री दिप्ती देवी आणि सौरभ गोखले हे लवकरच एका आगामी चित्रपटात एकत्रित पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. त्यांच्या या चित्रपटाचे चित्रिकरणदेखील सुरू असल्याचे कळत आहे. या चित्रपटामध्ये या दोघांसोबत आणखी एक कलाकार पाहायला मिळणार आहे. मात्र या चित्रपटाचे अदयापही गुलदस्त्यात आहे. तसेच या चित्रपटात या त्रिकुट पाहायला मिळणार असल्याचे कळत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री दिप्ती देवी आणि अभिनेता सौरभ गोखले ही हटके जोडी पहिल्यांदा एकत्रित पाहायला मिळणार आहे. सौरभ गोखले हा राधा ही बावरी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला होता. तसेच त्याने मांडला दोन घडीचा डाव, उंच माझा झोका, श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी अशा अनेक मालिका केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने योद्धा हा चित्रपटदेखील केला आहे. आता त्याच्या पेज फोर हा चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे. तर तो सध्या छडा या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवरदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत आहे. तर अभिनेत्री दिप्ती देवी हिनेदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने साता जन्माच्या गाठी, आंतरपाठ, मला सासू हवी अशा अनेक मालिका केल्या आहेत. त्याचबरोबर भाग्यविधाता, बडे अच्छे लगते हो यांसारख्या हिंदी मालिकेतूनदेखील तिने केल्या आहेत. पक पक पकाक आणि समर एक संघर्ष या चित्रपटातूनदेखील तिने आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखविली आहे. अशा पध्दतीने दिप्तीने मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे.