प्रियाचा वजनदार आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 09:32 IST2016-10-20T18:03:30+5:302016-10-21T09:32:57+5:30

अभिनेत्री प्रिया बापट हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वजनदार या चित्रपटात प्रिया अभिनयासोबत तिच्या सुरेख आवाजात गाणं देखील गाणार ...

Dear voice of Priya | प्रियाचा वजनदार आवाज

प्रियाचा वजनदार आवाज

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
अभिनेत्री प्रिया बापट हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वजनदार या चित्रपटात प्रिया अभिनयासोबत तिच्या सुरेख आवाजात गाणं देखील गाणार आहे. 
सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या चित्रपटाची चर्चा सध्या रंगू लागली आहे. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाने आपले वजन निर्माण केले आहे.

या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरला सोशल मीडियावर प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे सई आणि प्रि़याच्या अभिनयाचे कौतुक देखील करताना देखील त्यांचे चाहते दिसत आहेत.  त्याचप्रमाणे मराठीच्या इंडस्ट्रीच्या या टॉपच्या दोन अभिनेत्रींचे हे वाढलेले वजन पाहता प्रेक्षक देखील अवाक झाले आहेत. अशा या धमाल चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आता, ट्रेलरनंतर प्रियाच्या आवाजातील गोलू पोलू  हे गाणे देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वजनदार या सोहळ्यामध्ये हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. यावेळी सई ताम्हणकर, प्रिया बापट, चिराग पाटील, सिध्दार्थ चांदेकर, चेतन चिटणीस, निमार्ती विधी कासलीवाल, दिग्दर्शक सचिन कुंडलकर उपस्थित होते. या चित्रपटासाठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी बरीच मेहनत घेतली असल्याचे दिसते आहे.

तर प्रियाचा अभिनय आणि गाणे असा डबल धमाका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी इंडस्ट्रीच्या या दोन सुंदर अभिनेत्रींचा वजनदार प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील खूपच उत्सुक आहेत. 'लॅन्डमार्क फिल्म्स' निर्मित वजनदार हा चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Priya

Web Title: Dear voice of Priya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.