"...तर दशावतार सिनेमा करणार नाही, असं ठरलं होतं"; दिग्दर्शक सुबोध खानोलकरचं मोठं विधान, काय म्हणाला?
By देवेंद्र जाधव | Updated: October 5, 2025 12:00 IST2025-10-05T11:59:51+5:302025-10-05T12:00:26+5:30
दशावतार कधीच बनला असता, असं दिग्दर्शक सुबोध खानोलकरांनी विधान केलं आहे. काय होतं यामागचं कारण? जाणून घ्या

"...तर दशावतार सिनेमा करणार नाही, असं ठरलं होतं"; दिग्दर्शक सुबोध खानोलकरचं मोठं विधान, काय म्हणाला?
'दशावतार' सिनेमा १२ सप्टेंबरला रिलीज झाला. हा सिनेमा रिलीज होऊन ४ आठवडे झाले आहेत, तरीही 'दशावतार' सिनेमा अजूनही लोकांच्या पसंतीस उतरत आहे. 'दशावतार'चा दिग्दर्शक सुबोध खानोलकरने मोठं विधान केलं आहे. 'दशावतार' सिनेमा कधीच बनला नसता, असं त्यांनी सांगितलं आहे. काय होतं यामागचं कारण? स्वतः दिग्दर्शक सुबोध खानोलकरने खास किस्सा सांगितला आहे.
रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत सुबोध खानोलकरने सांगितलं की, ''मी जेव्हा गोष्ट लिहिली ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच नाव होतं ते म्हणजे दिलीप प्रभावळकर. कारण या भूमिकेची जी मागणी आहे, त्याच्यातली जी विविध रुपं आहेत, अभिनयासाठी विविध स्तरावर भावनिक बाजू आहेत, या सर्व गोष्टींसाठी एक कन्विक्शन लागतं. त्यामुळे हे सगळं करु शकणारा आणि तरीही त्या पात्रासारखा होऊन जाणारा कलाकार मिळणं खूप कठीण असतं. त्यामुळे दिलीप प्रभावळकर नसतील तर हा सिनेमा करणार नाही, असं आमचं ठरलं होतं.''
''दिलीप प्रभावळकरांना गोष्ट ऐकवली तेव्हा जनरली संवाद, हार्ड स्क्रीप्ट हातात असल्याशिवाय आणि खूप वाचन केल्याशिवाय ते होकार देत नाहीत. मी गोष्ट ऐकवली. त्यांनी अर्धा तास दिला. त्यानंतर आमची चर्चा होत अर्ध्याचे एक, एकाचे दोन आणि दोनाचे चार तास झाले. तेव्हा मला काहीतरी होऊ शकतं, अशी आशा निर्माण झाली. ते मला म्हणाले, मी इंटरेस्ट आहे पण आपण प्रोसेसमध्ये राहूया मग निर्णय घेऊ. मग मी माझा हुकुमाचा एक्का काढला. मी गुरु दादाला अप्रोच केलं.'' अशाप्रकारे सुबोधने हा खास किस्सा शेअर केला.