न्युयॉर्क फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘दारवठा’ ची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 20:49 IST2016-04-14T03:00:57+5:302016-04-13T20:49:26+5:30
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘दारवठा’ सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवांमध्ये दखल घेण्यात आली असून अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे रंगणाºया मानाच्या इंडियन ...

न्युयॉर्क फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘दारवठा’ ची निवड
र ष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘दारवठा’ सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवांमध्ये दखल घेण्यात आली असून अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे रंगणाºया मानाच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल आॅफ लॉस एंजलिसमध्ये निशांत रॉय बोम्बार्डे लिखित आणि दिग्दर्शित ‘दारवठा’ चा वर्ल्ड प्रिमियर झाल्यानंतर आता न्यूयॉर्कच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाची निवड झाली आहे.
‘दारवठा’ ही गोष्ट आहे, किशोरवयीन पंकजची. जो त्याच्या मित्रांपेक्षा थोडा वेगळा आहे. कारण त्याला त्याच्या वयाच्या मुलांसोबत खेळण्यास रस नाही. त्याऐवजी तो डान्स करणे, हातावर मेहेंदी काढून घेणे, आईच्या मेकअप सोबत खेळणे ह्या सर्व गोष्टीत जास्त रमतो. एका बाजूला भारतीय पुरुषप्रधान समाज आणि दुसºया बाजुला त्याला लैंगिकतेविषयी वाटणारी उत्सुकता हे द्वंद्व त्याच्या समोर आहे.
ह्या चित्रपटात ‘विटी दांडू’ फेम निशांत भावसार या बालकलाकाराने पंकजची भूमिका केली आहे. निशांत भावसारसोबतच नंदिता पाटकर, अनुराग वरळीकर, संजय पूरकर, रूची शर्मा आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.