‘डान्सिंग सुपरस्टार’ इज बॅक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 14:36 IST2016-06-10T09:06:26+5:302016-06-10T14:36:26+5:30

रुपेरी पडद्यावरील पहिले स्टंटमॅन... पहिले डान्सिंग सुपरस्टार... एक अवलिया... एक अलबेला... म्हणजे द ग्रेट भगवानदादा... अभिनेते भगवानदादा यांना सलाम ...

'Dancing superstar' is back! | ‘डान्सिंग सुपरस्टार’ इज बॅक !

‘डान्सिंग सुपरस्टार’ इज बॅक !

class="ii gt adP adO" id=":129" style="font-size: 12.8px; direction: ltr; margin: 5px 15px 0px 0px; padding-bottom: 5px; position: relative; color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; line-height: normal;">
रुपेरी पडद्यावरील पहिले स्टंटमॅन... पहिले डान्सिंग सुपरस्टार... एक अवलिया... एक अलबेला... म्हणजे द ग्रेट भगवानदादा... अभिनेते भगवानदादा यांना सलाम करणारा आणि त्यांच्या जीवनावर आधारित 'एक अलबेला' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने सिनेमाच्या भगवानदादा यांची भूमिका साकारणारे अभिनेता मंगेश देसाई यांच्याशी सिएनक्सने साधलेला हा दिलखुलास संवाद.
 
या सिनेमात आपण द ग्रेट भगवान दादा यांची भूमिका साकारताय. तर ही भूमिका ऑफर झाल्यानंतर आणि प्रत्यक्ष भूमिका साकारण्याची वेळ आली. त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या ?

भगवानदादा साकारणं हे मोठं चॅलेंज होतं.. भगवानदादा यांच्या जीवनावरील सिनेमात काम करणं एक अविस्मरणीय आणि लाईफटाईम अनुभव आहे.. मात्र सिनेमाची कथा शेखर सरतांडेल यांनी ऐकवली त्यावेळी सिनेमात माझी भूमिका काय असणार, मी काय करणार याबबत मी साशंक होतो.. मात्र शेखर तांडेल यांनी सांगितलं की तुला भगवानदादा साकारायचे आहेत.. त्यांनी मला माझे फोटो आणि भगवानदादा यांच्या फोटोत ब-याच गोष्टी सारख्या असल्याचं सांगितलं.. अभिनय तू करशील असा त्यांनी विश्वास दिला आणि डान्स तर निभावशीलच असा आत्मविश्वास त्यांना होता.. त्यामुळं एक ग्रेट दिग्दर्शक काय असतो याची अनुभूती त्यावेळी आली.. मात्र भगवानदादा यांच्याविषयी अभ्यास करण्यासाठी काहीच माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळं त्यांचा अलबेला हा सिनेमा तब्बल 25 वेळा मी पाहिला. त्यानंतर माझ्यात आणि भगवानदादा यांच्यातलं साम्य जाणवलं..  
   
या सिनेमात आपण भगवानदादा यांच्याप्रमाणे वावरताना दिसताय... तर मेकअप, वजन वाढवणं आणि नृत्यावर किती मेहनत घेतली ?

भगवानदादा साकारताना विशेष मेहनत अशी घेतली नाही.. ही सगळी किमया मेकअप आर्टिस्ट विद्याधर भट्टे यांची आहे. या भूमिकेसाठी मी जास्त काही वजन वाढवलं नाही.. मात्र रुपेरी पडद्यावर जे काही मी भगवानदादा यांच्या रुपात दिसतो ते सगळं क्रेडिट विद्याधर भुट्टे यांचं आहे.. मेकअप आर्टिस्ट हा सिनेमाचा अविभाज्य घटक असतो.. दिग्दर्शक, निर्माते असले तरी मेकअप आर्टिस्टचंही तितकंच अनन्यसाधारण महत्त्व असतं.कारण कलाकारमधलं जे दिग्दर्शकाला हवंय ते रुपेरी पडद्यावर साकारण्याची महत्त्वाची जबाबदारी ही मेकअप आर्टिस्टची असते असं मला वाटतं.. तसंच जे काही सिनेमात नृत्य केलंय त्याचं सगळं क्रेडिट स्टॅनली आणि सदा यांना जातं.. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळं डान्स करु शकलो. त्याबद्दलची मनातील भीती निघून गेली.
 
भगवानदादा यांची भूमिका साकारण्याची संधी मिळेल असं कधी वाटलं होतं का ?
 
भगवानदादा माझ्या आयुष्यातील घटक बनतील.. ते माझ्या आयुष्यात आशीर्वादरुपाने कधी येतील हे कधीही वाटलं नव्हतं.. लहानपणापासून भगवानदादा यांची गाणी ऐकायचो... भोली सूरत दिल के खोटे, शोला जो भडके... अशी सगळी गाणी ऐकायचो.. त्यावर नाचायचो.. मात्र प्रत्यक्ष भगवानदादा यांची भूमिका साकारण्याची संधी मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं..
 
विद्या बालन या सिनेमातून मराठीत एंट्री करतायत, तर त्यांच्यासोबत कामाचा अनुभव कसा होता ?
 
विद्या बालन यांच्याबद्दल काय बोलावं.. त्या ग्रेट आहेतच.. त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर बॉलीवुडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलंय.. त्यांच्यासारखी कलाकार या सिनेमात असणं खूप गरजेचं होतं.. त्यांना सिनेमा मोठा कसा करायचा हे माहिती आहे.. बरेच जण असे असतात की त्यांनी भूमिका मोठी करायची एवढं माहिती असतं.. केवळ बॉलीवुड स्टार आहे म्हणून त्यांनी मला कधीही कमी समजलं नाही.. शुटिंगच्या वेळीच नाही तर आजही त्या सांगतात की हा सिनेमा भगवानदादांचा सिनेमा आहे, हा मंगेशचा सिनेमा आहे. त्यामुळं त्यानं मीडियापुढे यावं असं त्या कायम म्हणत आल्यात..
 
मेकअप केल्यानंतर खुद्द विद्या बालन यांनीही आपल्याला ओळखलं नव्हतं.. तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल ?
 
शुटिंगच्या वेळी आदल्या दिवशी आम्ही भेटलो होतो.. त्यानंतर दुस-या दिवशी असंच मेकअप करुन मी त्यांच्यासमोर गेलो तेव्हा त्यांनी मला ओळखलंच नाही. थोड्या वेळाने त्या माझ्याकडे आल्या अन् म्हणाल्या की सॉरी सॉरी मेकअपमुळे मी तुम्हाला ओळखलंच नाही. सेटवरील प्रियांकानं सांगितलं की तुम्हीच मंगेश देसाई आहात तेव्हा कळलं. जेव्हा तुमचे कोस्टारसुद्धा तुम्हाला ओळखत नाहीत. यातच सगळं आलं असं मला वाटतं. हे सगळं शक्य झालं ते मेकअप आर्टिस्ट विद्याधर भट्टे यांच्यामुळं..
 
विद्या बालन यांनी भूमिका साकारल्यामुळं या सिनेमाला ग्लॅमर मिळालंय असं वाटतं का ? याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न की बॉलीवुडच्या कलाकारांनी मराठीत काम केल्यानं मराठी कलाकार झाकोळले जातात का ?
 
हा सिनेमा एका महाराष्ट्रीय नटाचा म्हणजेच भगवान आबाजी पालव यांचा आहे. ज्या काळी सिनेसृष्टीत बंगाली कलाकारांचं वर्चस्व संपलं होतं आणि पंजाबी कलाकारांचं वाढू लागलेले. त्यावेळी भगवानदादा यांनी आपलं स्वतःचं असं स्थान चित्रपटसृष्टीत निर्माण केलं. त्यामुळं एक अलबेला हा सिनेमा त्यांच्या जीवनावरील सिनेमा आहे. मात्र विद्या बालन यांनी काम केल्यानं, गीता बाली साकारल्यानं सिनेमाला ग्लॅमर मिळालंय. मात्र त्याचवेळी खुद्द विद्या मॅडम म्हणाल्या की मला मराठीत काम करायला आवडेल. मात्र तुम्ही मराठी कलाकार जर हिंदीत आलात तर आमच्या कलाकारांची सुट्टी होईल.. तरीही मला वाटतं की कोणत्याही सिनेमात कोणत्याही कलाकारांनी काम केलं तर कुणीही झाकोळले जात नाही. हिंदी कलाकारांनी मराठीत काम केलं तर मराठी कलाकार झाकोळले जात नाही किंवा मराठी कलाकारांनी हिंदीत काम केलं तर त्यांना काहीही धोका निर्माण होत नाही. त्यामुळं काही झालंच तर एक चांगला सिनेमा बनतो असं मला वाटतं.
 
विद्या बालन यांना अतिमहत्त्व दिलं जात असल्यमुळं आपण काळजीत आहात असं ऐकायला मिळतंय त्यात किती तथ्य आहे ?  
 
हे एक हजार कोटी टक्के खोटं आहे.. विद्या बालन या सिनेमाच्या युएसपी आहेत.. त्यांच्यामुळे सिनेमाला अधिक ग्लॅमर प्राप्त झालंय.. मात्र त्यांच्यामुळं मला भीती किंवा काळजी कधी वाटली नाही.. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये आणल्यानं सिनेमालाच फायदा होणार आहे.. त्यामुळं त्यांच्यामुळं माझं महत्त्व कमी झालं असं कधीही वाटलं नाही.. उलट एवढ्या मोठ्या अभिनेत्रीसह मी काम केलंय. सिनेमात माझं नाव त्यांच्या नावासोबत येतंय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
 
भगवानदादा एक स्वतः मनमौजी व्यक्ती होते.तर त्यांच्या जीवनावरील सिनेमाचं शुटिंग म्हटल्यावर धम्माल मस्ती झाली  असणार. शुटिंगच्या वेळचा एखादा गंमतीदार प्रसंग ?
 
शूटिंगच्या वेळी बरीच धम्माल केली.. सगळं काही गंमतीदार होतं. सकाळ अप्रतिम ब्रेकफास्टनं व्हायची. आमचे मेकअपदादा विद्या जे आमचे वडील बनले होते. ते आमची खूप काळजी घ्यायचे, खूप काही खाऊ घालायचे.एखाद्या सिनेमाच्या सेटवर वातावरण बिघडलं असेल तर ते वातावरण ठीक करण्यासाठी काही ना काही केलं जातं आणि तो किस्सा बनतो. मात्र आमच्या सेटवर कायमच खेळीमेळीचं गंमतीदार वातावरण असायचं. 
 
हा सिनेमा रसिकांनी का पाहावा आणि आजवरील बायोपिक सिनेमांपेक्षा हा सिनेमा वेगळा कसा ठरेल ?
 
भगवानदादा यांच्या जीवनावरील हा सिनेमा एक उत्तम कलाकृती पाहिल्याची तुम्हाला अनुभूती देऊन जाईल.. भगवानदादा कसे होते. त्यांच्या जीवन संघर्षातून आपणालाही बरंच काही शिकायला मिळणार आहे.हा बायोपिक आजवर आलेल्या बायोपिकपेक्षा नक्कीच वेगळा ठरणार आहे.. कारण हा सिनेमा ख-या अर्थाने प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं.भगवान आबाजी पालव ही व्यक्ती ग्रेट भगवानदादा कसे बनले हे पाहणं रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरेल. अनेक गाड्या आणि एका स्टुडिओचे ते मालक कसे बनतात हे दाखवण्यात आलंय.आजवर भगवानदादांच्या उतारवयातील व्यथा अनेकांना माहिती होत्या. मात्र या सिनेमामुळं त्यांचं जीवनचरित्र उलगडलं जाणार आहे.. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह नोटवर कुठलंही प्रोडक्ट घडलं तर काय होतं याचं उत्तम उदाहरण हा सिनेमा ठरेल. त्यामुळं नक्कीच हा सिनेमात ख-या अर्थाने वेगळा ठरणार आहे.
 
 
 

Web Title: 'Dancing superstar' is back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.