Congratulation: प्रिया बापट देणार 'ही' Good News?,सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 10:14 IST2018-11-29T10:07:22+5:302018-11-29T10:14:01+5:30

ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच फॅन्सकडून आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांकडून दोघांवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

Congratulation:Good news from Priya Bapat, Share Pic On Social Media | Congratulation: प्रिया बापट देणार 'ही' Good News?,सोशल मीडियावर शेअर केला फोटो

Congratulation: प्रिया बापट देणार 'ही' Good News?,सोशल मीडियावर शेअर केला फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील एक गोड जोडी म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत. दोघांनीही रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. प्रियाने मराठी आणि हिंदी सिनेमा, मालिकांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. दुसरीकडे उमेशचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. त्यानेही आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर जादू केली आहे. दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फॅन्सशी संवाद साधतात. आपले फोटो, व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करून फॅन्सशी संवाद साधतात. आपल्या खासगी जीवनातील बऱ्याच गोष्टीसुद्धा मनमोकळेपणाने दोघं इथं फॅन्ससह शेअर करतात. सुख- दुःख किंवा जीवनातील कोणतीही गोष्ट ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतात. 

अशीच एक गोड बातमी प्रिया बापटने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. ‘एक गोड बातमी आहे’ या कॅप्शनसह उमेशने प्रियाला प्रेमाने जवळ घेतलेला सुंदर आणि रोमँटिक फोटो या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच फॅन्सकडून आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांकडून दोघांवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. प्रिया आणि उमेशच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चा या पोस्टमुळे सुरू झाल्या असून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

लवकरच उमेश कामत पत्नी प्रिया बापटसह एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास ४ वर्षांनंतर ही रिअल लाइफ जोडी रिल लाइफमध्ये एकत्र येणार आहे. मात्र या सिनेमाची कथा, दोघांची भूमिका याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे उमेश आणि प्रियाच्या या आगामी सिनेमाची रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल. उमेश कामतने दोघे एकत्र काम करत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले असले तरी अद्याप या चित्रपटाची कथा व शीर्षक समजू शकलेले नाही. 

Web Title: Congratulation:Good news from Priya Bapat, Share Pic On Social Media