‘झी युवा’ वाहिनीचा दिमाखदार सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 15:57 IST2016-08-05T10:27:52+5:302016-08-05T15:57:52+5:30

झी युवा’ वाहिनीद्वारे मराठी टेलिव्हीजनवर २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहे नवे पर्व. संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत असलेल्या या वाहिनीचा ...

The concluding ceremony of 'Zee Yuva' was completed | ‘झी युवा’ वाहिनीचा दिमाखदार सोहळा संपन्न

‘झी युवा’ वाहिनीचा दिमाखदार सोहळा संपन्न

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">झी युवा’ वाहिनीद्वारे मराठी टेलिव्हीजनवर २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहे नवे पर्व. संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत असलेल्या या वाहिनीचा दिमाखदार उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.

 

झी नेटवर्कच्या शारदा सुंदर (कार्यकारी उपाध्यक्ष, क्लस्टर हेड - प्रादेशिक चॅनेल) बवेश जानवलेकर (व्यवसाय प्रमुख, झी युवा आणि झी टॉकीज) यांच्या हस्ते वाहिनीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक ह्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याची रंगत वाढवली. 

झी युवा वाहिनीच्या मालिकेतील सुहास जोशी, ज्योती सुभाष, विवेक लागु, तुषार दळवी, विजय पटवर्धन, विद्याधर जोशी, जयवंत वाडकर, सुप्रिया पाठारे, राजेश देशपांडे, सुप्रिया विनोद, अभय कुलकर्णी, माधवी सोमण, चंद्रशेखर कुलकर्णी, सक्षम कुलकर्णी, ओमकार गोवर्धन, विवेक सांगळे, श्रीखर पित्रे, सिद्धी कारखानीस, समीहा सुळे, रुचिता जाधव, शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे, शशांक केतकर, मधुरा देशपांडे, संदीप पाठक, रश्मी अनपट, मिताली मयेकर, अमृता देशमुख, रसिका वेंगुर्लेकर, शुभांकर तावडे, सिध्दार्थ खिरीड, ओंकार राउत, अभय कुलकर्णी, नीरज, संचिता कुलकर्णी, केतकी पालव, स्नेहा चव्हाण, अपूर्व रांझणकर देखील या सोहळ्यास उपस्थित होते.  

या सोहळ्याची सुरुवात एका अनोख्या अंदाजात झाली. प्रेक्षकांनी याआधी कधीहि न पाहिलेल्या Human Interactive AV द्वारे झी युवा वाहिनीची मुल्ये आणि वाहिनीबद्दलची माहिती सोहळ्यास उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना दाखविण्यात आली. वैभव तत्ववादी आणि स्पृहा जोशी यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

हळूहळू वाढत असलेल्या या रंगतदार सोहळ्यामध्ये जसराज जोशी यांनी ‘बन मस्का’, ‘श्रावणबाळ रॉकस्टार’आणि अमित राज यांनी ‘फ्रेशर्स’ या मालिकेची शीर्षक गाणी गाऊन जमलेल्या प्रेक्षकांना आपल्या धमाकेदार आणि जोशपूर्ण संगीताने मंत्रमुग्ध केले. तर ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेतील कलाकारांनी आपल्या उत्सुफुर्त विनोदी कौशल्याने सगळ्यांना पोट धरून हसण्यास भाग पाडले. झी युवावरील मालिकांच्या कलाकारांची आणि मालिकेची झलक उपस्थितांना बघायला मिळाली.

झी युवा परिवाराचा अविभाज्य भाग म्हणजे यावर सुरु होणाऱ्या मालिका ज्या प्रेक्षकांना एक नाविन्यमय अनुभव देणार आहे. प्रेक्षकांचा मराठी टेलिव्हिजन बघण्याचा अनुभव समृद्ध करतील अश्या स्वरूपाचे कार्यक्रम झी युवावर २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहेत.

 झी युवावर प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे विषय तर नक्कीच आहेत, पण अनेक नवेनवे विषय जे याआधी कधीच मराठी प्रेक्षकांनी पाहिले नसतील ते त्यांच्यासमोर येणार आहेत एका नव्या रुपात, नव्या ढंगात.

झी युवा वाहिनी नवीन विचारांना प्रोत्साहन देणारे, भविष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देणारे आणि आजच्या प्रेक्षकवर्गाशी साधर्म्य साधणारे कार्यक्रम याचे अजोड त्रिकुट एवढेच नव्हे तर नाते-संबंधाना नव्याने बघण्याची सुवर्णसंधी देणारे कार्यक्रम मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

झी युवावरील कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकवर्गाला दोस्ती - यारी, मज्जा– मस्ती, हास्य-विनोद, हळूवार उमलणारं प्रेम, या सगळ्याच प्रकारची मेजवानी बघायला मिळणार आहे. या मालिकांमध्ये कुठलेही डाव पेच नाही, व्हिलन नाही, टेंशन नाही तर फक्त निखळ आनंद देणारे कार्यक्रम जे मनोरंजन देतील वीदाउट एनी टेंशन फक्त झी युवावर.

झी युवावरील मालिकांमध्ये असणार आहेत फ्रेशर्स सोमवार ते शुक्रवार संध्या ७ वाजता, श्रावणबाळ रॉकस्टार सोमवार ते शुक्रवार संध्या ७.३० वा. बन मस्का सोमवार ते शुक्रवार रात्री ८.०० वा. लव्ह लग्न लोचा सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वा. आणि इथेच टाका तंबू सोमवार ते शुक्रवार रात्री ९.०० वा.  

तेंव्हा बघायला विसरू नका २२ ऑगस्टपासून झी युवा.. नवे पर्व, युवा सर्व !

Web Title: The concluding ceremony of 'Zee Yuva' was completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.