छान योगायोग... 'बाप-ल्योक' चित्रपटातील लेक खऱ्या आयुष्यात बनला 'बाप'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 07:55 PM2023-09-06T19:55:04+5:302023-09-06T20:12:29+5:30

दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने (Makrand Mane) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) एका सिनेमासाठी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

Coincidentally... Bap-Lyok film's hiro Vitthal Kale became 'Father' in real life too | छान योगायोग... 'बाप-ल्योक' चित्रपटातील लेक खऱ्या आयुष्यात बनला 'बाप'

छान योगायोग... 'बाप-ल्योक' चित्रपटातील लेक खऱ्या आयुष्यात बनला 'बाप'

googlenewsNext

मुंबई - वडिल आणि मुलाच्या नात्याची भावनिक गोष्ट सांगणारा बाप-ल्योक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून ७० मिमि पडद्यावरील बाप-लेकाची कथा लोकांच्या पसंतीस उतरली आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचं कौतुक केलंय. १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील अभिनेता विठ्ठल काळे हे खऱ्या आयुष्यात बाप बनले आहेत. चित्रपटात लेकाची भूमिका निभावणाऱ्या विठ्ठल काळेंच्या घरी ही गोड बातमी आल्याचा छान योगायोग जुळून आलाय.

दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने (Makrand Mane) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) एका सिनेमासाठी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. मकरंद माने 'बापल्योक' (Baaplyok) हा सिनेमा घेऊन आले आहेत. मुलगा आणि बापाच्या नात्यावर आधारलेल्या 'बापल्योक' चित्रपटात शशांक शेंडे आणि विठ्ठल काळे यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात शशांक शेंडे यांनी बापाची तर विठ्ठल काळे यांनी लेकाची भूमिका साकारली आहे. लेकाची भूमिका निभावणारे विठ्ठल काळे खऱ्या आयुष्यात आता बाप बनले आहेत. विठ्ठल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बाळाचा हातात घेतलेला फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. 

बाप झालो...

माझा "बाप ल्योक" हा चित्रपट थेटर मध्ये चालू आहे आणि मी खऱ्याआयुष्यात एका मुलाचा बाप झालो. किती छान योगायोग. मागच्या आठवड्यात भावाला ही मुलगा झाला. मित्रा, तुला हातात पकडल्यावर स्थळ, काळ, अवकाश, भवताल या सगळ्यांचा विसर पडतो, फक्त तू जाणवतो... तुझं स्वागत आहे, अशा शब्दात विठ्ठल काळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

दरम्यान, बापल्योक चित्रपटात शशांक शेंडे यांनी पुन्हा एकदा अफलातून वडील साकारले आहेत. तर, विठ्ठल काळेने साकारलेला सागरही प्रेक्षकांच्या स्मरणात राहण्याजोगा आहे. मूळ ग्रामीण भागातील असल्याने गावाकडच्या तरुणांच्या वागणुकीतील बारकावे विठ्ठलने अगदी हेरून अभियनातून सादर केले आहेत. 

अशी आहे चित्रपटाची कथा

चित्रपटाची कथा तात्या आणि सागर या बाप-लेकाभोवती गुंफण्यात आली आहे. पुण्यातील नोकरी सोडून सागर शेती करण्यासाठी गावी आल्याने तात्यांचा त्याच्यावर राग असतो. सागरचं लग्न जमलेलं असून, घरी लगीनघाई सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांकडे जायचं असतं. तात्यांसोबत पटत नसल्याने सागर आपल्या मित्रांना त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार करत असतो, पण तात्यांच्या स्वभावामुळे कोणीही तयार होत नाही. अखेर पत्रिका वाटण्यासाठी सागरच आपल्या बाईकवरून तात्यांना नातेवाईकांकडे नेण्यासाठी सज्ज होतो. त्यानंतर दोघांमधल्या नात्यांमधले भावनिक पदर हळूहळू उलगडत जातात. या सोबतच इतर नातेवाईकांसोबतचे संबंधही अधोरेखित होतात.
 

Web Title: Coincidentally... Bap-Lyok film's hiro Vitthal Kale became 'Father' in real life too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.