चिटरचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 10:36 IST2016-04-16T05:06:37+5:302016-04-16T10:36:37+5:30

चीटर चित्रपटाचे ७०% शुटींग हे मॉरिशियस येथे झाले असून उर्वरित शेवटच्या टप्प्यातील शुटींग हे पुणे येथे झाले आहे.

Chitter Trailer Display | चिटरचा ट्रेलर प्रदर्शित

चिटरचा ट्रेलर प्रदर्शित

 
जय फणसेकर दिग्दर्शित चीटर या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता वैभव तत्ववादी या चित्रपटात जबरदस्त चीटर बनला आहे. हा ट्रेलर पाहताा हा एक कॉमेडी चित्रपट असल्याचं लक्षात येतं. वैभव तत्वावादी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर या व्यतिरिक्त अभिनेते हृषीकेश जोशी, वैभव तत्ववादी, अभिनेत्री आसावरी जोशी, सुहास जोशी, वृषाली चव्हाण आणि पूजा सावंत अशी या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट आहे.अखिल जोशी यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली असून अभिजित नार्वेकर यांनी  संगीत दिले आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, गायक अवधूत गुप्ते, गायिका उर्मिला धनगर, आनंदी जोशी यांच्या आवाजात सुमधूर गाणी स्वरबध्द करण्यात आली आहेत..चीटर चित्रपटाचे ७०% शुटींग हे मॉरिशियस येथे झाले असून उर्वरित शेवटच्या टप्प्यातील शुटींग हे पुणे येथे झाले आहे.



Web Title: Chitter Trailer Display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.