चिन्मय पुन्हा करणार नाटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 10:01 IST2016-05-03T04:29:12+5:302016-05-03T10:01:43+5:30

मराठी इंडस्ट्रीत सर्व कलाकारांमध्ये रंगभूमीचा फ्लेव्हर चढलेला दिसत आहे. प्राजक्ता माळी, तेजश्री प्रधान, शशांक केतकर, ललित प्रभाकर, अमेय वाघ, ...

Chinmay plays again | चिन्मय पुन्हा करणार नाटक

चिन्मय पुन्हा करणार नाटक

ाठी इंडस्ट्रीत सर्व कलाकारांमध्ये रंगभूमीचा फ्लेव्हर चढलेला दिसत आहे. प्राजक्ता माळी, तेजश्री प्रधान, शशांक केतकर, ललित प्रभाकर, अमेय वाघ, सुरूची आडारकर, सुयश टिळख, सौरभ गोखले यांच्या पाठोपाठ आता,  सर्वाचा लाडका अभिनेता चिन्मय मांडलेकर देखील पुन्हा रंगभूमीकडे वळणार असल्याचे त्याने सोशलमिडीयावर शेअर केले आहे. तसेच झेंडा चित्रपटानंतर मी आणि सिध्दार्थ चांदेकर पुन्हा एकदा मग्न तळयाकाठी या नाटकाच्या निमित्ताने एकत्रित येणार असल्याचे देखील त्याने सांगितले.  चिन्मयने यापूर्वीदेखील 'मि. अ‍ॅण्ड मिसेस.' आणि 'समुद्र' या नाटकमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.तसेच
तू तिथे मी ही त्याची मालिका देखील लोकप्रिय ठरली होती. नुकताच त्याचा रेती ही चित्रपटानेदेखील बॉकसआॅफीसवर यश मिळविले आहे. म्हणजेच त्याचे मालिका असो वा चित्रपट चिन्मयने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनयासोबतच मालिका-नाटकांचे लेखन आणि संवांदची धुरासुध्दा तो उत्कृष्टरीत्या सांभाळतो. आता तो मग्न तळयाकाठी या नाटकमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या नाटकमध्ये त्याच्यासोबत नेहा जोशी, वैभव मांगले, सिध्दार्थ चांदेकर या कलाकारांचादेखील समावेश आहे. मग्न तळयाकाठी हे नाटक वाडा चिरेबंदी या नाटकचा पुढचा भाग आहे. या नाटकाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. 
 

Web Title: Chinmay plays again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.