गणरायाच्या चरणी ‘शान’दार गीत अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 12:29 IST2017-08-25T06:59:11+5:302017-08-25T12:29:11+5:30
शशांक कोंडविलकर यांच्या लेखणीने सजलेल्या या गीताला गणेश सुर्वे यांनी संगीतबद्ध केले आहे.
गणरायाच्या चरणी ‘शान’दार गीत अर्पण
ग ेशोत्सवाचे वेध लागताच सगळीकडे गणपती बाप्पांची गीते ऎकायला मिळतात. दरवर्षी बाप्पाची नवनवीन गीते येत असतात. आपल्या आवाजाची मोहोर हिंदी– मराठी चित्रपटसृष्टीत उमटविणारे प्रसिध्द गायक शान ‘माझा बाप्पा श्री’ हा बाप्पाच्या गीताचा सोलो अल्बम रसिकांसाठी घेऊन आला आहे. हे गीत नुकतंच प्रकाशित करण्यात आले असून ‘श्रीगणेशाचं गीत गाण्याचा योग जुळून आल्याचा आनंद व्यक्त करताना हे धमाकेदार गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल’ असा विश्वास शानने यावेळी व्यक्त केला.शशांक कोंडविलकर यांच्या लेखणीने सजलेल्या या गीताला गणेश सुर्वे यांनी संगीतबद्ध केले आहे. गणपतीचं गीत जोशपूर्ण हवंच. यासाठी गिरगावातील गिरगाव ध्वज पथक, गजर, कलेश्वरनाथ, जगदंब, राजमुद्रा, स्वस्तिक अशा सहा लोकप्रिय ढोल-ताशा पथकाने या गीताला साथ दिली आहे. या गीतातून उत्सवाचे सर्व भाव प्रकट झाले आहेत. या गीताचे छायांकन नितीन पाटील, पराग सावंत, प्रतिक वैती, प्रथमेश अवसरे, शुभम वळुंज यांनी केले असून स्टुडिओ छायांकनाची जबाबदारी विकास झा यांनी सांभाळली आहे. संकलन शशांक कोंडविलकर, प्रशांत कोंडविलकर, मिलिंद हेबळे यांचं आहे.