​चरणदास चोर ‘i Phone X’ स्पर्धेत सोलापूरचा ऋषी अंधारे ठरला विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 04:35 AM2018-01-02T04:35:48+5:302018-01-02T10:05:48+5:30

गेली महिनाभर फेसबुकवर जिथे पाहावे तिथे ‘चरणदास चोर’ अशी अक्षरे लिहिलेल्या रंगीबेरंगी पत्र्याच्या ट्रंक सोबतच्या फोटोजने अक्षरश: धुमाकुळ घातला ...

Champdar thief 'i Phone X' was the winner of the Sultan of Solapur in the dark | ​चरणदास चोर ‘i Phone X’ स्पर्धेत सोलापूरचा ऋषी अंधारे ठरला विजेता

​चरणदास चोर ‘i Phone X’ स्पर्धेत सोलापूरचा ऋषी अंधारे ठरला विजेता

googlenewsNext
ली महिनाभर फेसबुकवर जिथे पाहावे तिथे ‘चरणदास चोर’ अशी अक्षरे लिहिलेल्या रंगीबेरंगी पत्र्याच्या ट्रंक सोबतच्या फोटोजने अक्षरश: धुमाकुळ घातला होता. जो तो त्या रंगीबेरंगी ट्रंक सोबत अत्यंत नाटकीय पद्धतीने फोटो काढून फेसबुकवर अपलोड करत होता. त्याचे कारणही तसेच होते. कारण, त्या ट्रंकसोबत फोटो काढणाऱ्याला सध्याचा सर्वात अद्ययावत i Phone X बक्षीस मिळणार होता. चरणदास चोर या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून चित्रपटातील महत्त्वाची व्यक्तिरेखा असलेल्या रंगीबेरंगी पत्र्याच्या ट्रंक घेऊन एक ऑनलाईन स्पर्धा राबविण्यात आली होती. त्या स्पर्धेतून भाग्यशाली विजेता निवडण्याची सोडत आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट करण्यात आली आणि सोलापूरचा ऋषी अंधारे हा सर्वाधिक लाईक्स मिळविण्याच्या विभागातून दुसऱ्या क्रमांकावर असलेला तरुण लकी ड्रॉ पद्धतीने अंतिम विजेता घोषित करण्यात आला. सोलापूरच्या ऋषी अंधारेने i Phone X या स्मार्टफोनचा मानकरी ठरला आहे.

Also Read : मगरींनी घेरूनही ‘तो’ चरणदास चोर सहीसलामत सुटला


या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून हजारो फोटोज चरणदास चोर या फेसबुकपेजवर टॅग होत होते. त्यातील सर्वात जास्त लाईक्स मिळविणारे आणि सर्वात कल्पक तसेच नाटकीय पद्धतीने काढलेले फोटो असे दोन विभाग होते. त्यातून अकरा स्पर्धकामधून लकी ड्रॉ पद्धतीने विजेता निवडण्यात आला. घोषित केल्याप्रमाणे १ जानेवारी २०१८ रोजी संध्याकाळी ७ वाजता चरणदास चोर या चित्रपटाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून लकी ड्रॉ थेट प्रसारित करण्यात आला.
मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मध्ये चरणदास चोर या चित्रपटातील रंगीबेरंगी ‘श्यामराव’ ट्रंक ठेवण्यात आली होती. त्याच बरोबर महाराष्ट्रातील जवळपास २५ महाविद्यालयांमध्ये आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रमोशन कार्यक्रमादरम्यान ती ट्रंक नेण्यात आली होती. त्यामुळे फेसबुकवर जिथे पाहावे तिथे त्या रंगीबेरंगी ट्रंकसोबतचे फोटोज झळकत होते. प्रसिद्धीच्या या अनोख्या तंत्रामुळे २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘चरणदास चोर’ तिकीट बारीवर देखील जोर पकडून आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे लेखक-दिग्दर्शक श्याम माहेश्वरींसह युनिट प्रोडक्शनचे दीपा माहेश्वरी आणि संजू होलमुखे या निर्मात्यांनी रसिकांचे आभार मानले आहेत.
या अनोख्या स्पर्धेची लकी ड्रॉ सोडत पाहण्यासाठी 
cnxoldfiles/story.php?story_fbid=748880961971340&id=721216714737765 या लिंकवर क्लिक करा.

Web Title: Champdar thief 'i Phone X' was the winner of the Sultan of Solapur in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.