चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे आहे सुगरण, हा घ्या पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 15:46 IST2021-03-05T15:46:17+5:302021-03-05T15:46:57+5:30

श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

chala hawa yeu dya fame shreya bugde is very good cook | चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे आहे सुगरण, हा घ्या पुरावा

चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे आहे सुगरण, हा घ्या पुरावा

ठळक मुद्देतिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून श्रेया एक खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबत खूप चांगली स्वयंपाकी देखील आहे असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत.  

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कार्यक्रमाला अनेक वर्षं झाली असून या कार्यक्रमाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या कार्यक्रमाद्वारे डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात.


श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. श्रेयाने नुकताच जेवणाचा फोटो टाकला आहे. या फोटोत आपल्याला विविध पदार्थ पाहायला मिळत आहेत. यात भात, कोलंबीची आमटी आणि मच्छी फ्राय असे विविध पदार्थ दिसत आहेत. हे सगळे पदार्थ मी बनवले आहे असे तिने या फोटोसोबत लिहिले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून श्रेया एक खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबत खूप चांगली स्वयंपाकी देखील आहे असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत.  

श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचसोबत समुद्र या नाटकात ती एका गंभीर भूमिकेत दिसली होती. या नाटकातील तिच्या आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते.

Web Title: chala hawa yeu dya fame shreya bugde is very good cook