समुद्र या नाटकात स्पृहा जोशीची जागा घेणार आता छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 12:04 IST2018-07-05T11:57:40+5:302018-07-05T12:04:59+5:30

समुद्र या नाटकात प्रेक्षकांना चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी यांची जोडी पाहायला मिळाली होती. या नाटकात आता स्पृहाची जागा छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री घेणार आहे.

chala hawa yeu dya fame shreya bugde in samudra natak | समुद्र या नाटकात स्पृहा जोशीची जागा घेणार आता छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री

समुद्र या नाटकात स्पृहा जोशीची जागा घेणार आता छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भरत गणेशपुरे, श्रेया बुगडे यांना एक ओळख निर्माण करून दिली आहे. श्रेयाला या कार्यक्रमाने चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली आहे. श्रेया आता छोट्या पडद्यानंतर रंगमंचाकडे वळली आहे, भद्रकाली प्रोडक्शनच्या समुद्र या नाटकात ती आता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या नाटकासाठी तिने तालमी करायला देखील सुरुवात केली आहे. 
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे श्रेयाने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. आता ती एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिनेच इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून नाटक लवकरच... असे त्यात लवकरच लिहिले आहे. या पोस्टमध्ये तिने भद्रकाली प्रोडक्शनचे सर्वेसर्वा प्रसाद कांबळी यांना टॅग केले आहे. समुद्र हे भद्रकाली प्रोडक्शनचे नाटक चांगलेच गाजले होते. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले होते. या नाटकात चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. 2015 साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. हे नाटक मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित होते तर या नाटकाचे दिग्दर्शन स्वतः चिन्मय मांडलेकरने केले होते. या नाटकाचे जवळजवळ 123 प्रयोग झाले होते. पण काही कारणास्तव या नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आले होते. पण आता हे नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे श्रेयाला केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांचे देखील प्रचंड प्रेम मिळाले आहे. समुद्र या नाटकात काम करण्यासाठी श्रेया खूपच उत्सुक आहे. समुद्र या नाटकाद्वारे तिच्या रंगमंचावरील इनिंगला सुरुवात करत आहे. तिची ही इनिंग नक्कीच यशस्वी ठरेल अशी श्रेयाच्या फॅन्सना खात्री आहे. 

Web Title: chala hawa yeu dya fame shreya bugde in samudra natak