'के दिल अभी भरा नही' या नाटकाच्या 75 व्या प्रयोगाला सेलिब्रिटींनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 12:49 IST2017-01-24T07:19:40+5:302017-01-24T12:49:40+5:30

'के दिल अभी भरा नही' या नाटकाच्या 75 व्या प्रयोगाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अशोक सराफ, ...

Celebration of 'Kya Dil Har Hoon Hahan Naa', the 75th experiment of the play has been celebrated by celebrities | 'के दिल अभी भरा नही' या नाटकाच्या 75 व्या प्रयोगाला सेलिब्रिटींनी लावली हजेरी

'के दिल अभी भरा नही' या नाटकाच्या 75 व्या प्रयोगाला सेलिब्रिटींनी लावली हजेरी

'
;के दिल अभी भरा नही' या नाटकाच्या 75 व्या प्रयोगाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अशोक सराफ, कांचन अधिकारी, सुनील बर्वे, दिग्दर्शक केदार शिंदे, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, संगीतकार कौशल इनामदार यांच्यासह अनेक सेलेब्स यावेळी हजर होते. 

मंगेश कदम यांचे दिग्दर्शन असलेले हे नाटक खऱ्या आयुष्यातील घटनांचा वेध घेत असल्यामुळे, नाट्यरसिकांना ते आपलेसे करण्यात यशस्वी होत आहे. 'गोष्ट तशी गमतीची' या गाजलेल्या नाटकाचे गमतीदार दांपत्य मंगेश कदम आणि लीना भागवत यांची रिअल केमिस्ट्री या नाटकामधून दिसून येते. तसेच चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांच्याही यात भूमिका आहेत. एकेकाळी विक्रम गोखले आणि रीमा लागू यांनी गाजवलेल्या या नाटकाला नव्याने उभे करत, आजच्या नव्या दमाच्या कलाकारांनी 'के दिल अभी भरा नही' नाटकाला चांगलाच न्याय दिला आहे.
मराठी नाटकांना प्रेक्षक जास्त मिळत नसल्याची ओरड अनेकदा केली जात असे. परंतू आता नाट्यविश्वाला देखील सुगीचे दिवस आले असून अनेक नाटकांची शंभरी होताना आपण पाहतो आहे. सिनेमांपेक्षा जास्त प्रेक्षक नाटकाला पसंती देत असल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. मराठी रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस नाटके रंगमंच गाजविताना दिसत आहेत. आता हेच पाहा ना लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या भूमिका असलेले , के दिल अभी भरा नही या नाटकाची नुकतीच पंच्याहत्तरी झाली आहे. या नाटकाच्या टिमने त्यांचे यशस्वी पंच्याहत्तर प्रयोग पूर्ण केले आहेत. पती पत्नीच्या नात्यावर भआष्य करणाºया या नाटकाला नाट्यरसिकांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे. पूर्वी हे नाटक रीमा लागू आणि विक्रम गोखले यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने चांगलेच गाजविले होते. तर सध्या लीना आणि मंगेश यांची अफलातून जोडी हे नाटक यशस्वी करत असल्याचेच पाहायला मिळतेय. त्यामुळे नाट्यरसिकांना आवडत असलेले हे नाटक लवकरच शंभरी करेल यात काही शंकाच नाही.

Web Title: Celebration of 'Kya Dil Har Hoon Hahan Naa', the 75th experiment of the play has been celebrated by celebrities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.