समाजातील वास्तव कहाणी सांगणारा बरड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 11:57 IST2016-06-11T06:27:36+5:302016-06-11T11:57:36+5:30
एकापाठोपाठ समाजाचे वास्तव मांडणारे निर्माते प्रमोद गोºहे यांचा रेतीनंतर आणखी एक समाज जागृत करणारा बरड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित ...
.jpg)
समाजातील वास्तव कहाणी सांगणारा बरड
ए ापाठोपाठ समाजाचे वास्तव मांडणारे निर्माते प्रमोद गोºहे यांचा रेतीनंतर आणखी एक समाज जागृत करणारा बरड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मराठीमध्ये समकालीन विषयांवर चित्रपटांचे प्रमाण वाढत असून जमीन खरेदी-विक्री व्यवहारांचे प्रमाण वाढल्यावर बदललेल्या नात्यांचे चित्रण बरड या चित्रपटामध्ये करण्यात आले आहे. या सगळ्याकडे व्यंगात्मक टिप्पणी करताना बरड हा विचार करण्यास लावणारा आहे. या चित्रपटामध्ये सांगली जिल्ह्यातील अलकुड या गावाची प्रातिनिधीक कथा आहे. गावामध्ये एक सर्व्हे सुरू होतो. एजन्सी जयपूरची असल्याने सगळे इंग्रजी बोलणारे असतात. त्यामुळे गावकºयांना काय चाललेच काही कळत नाही. त्याचदरम्यान एक अफवा पसरते, की एक प्रकल्प येणार आहे. त्यामुळे गावातील अगदी पडीक जमिनींना अचानक भाव येतो. त्यातच महसूलमंत्री आणि विद्यमान आमदारांच्या सत्तासंघर्षात खरी गोष्ट बाहेरच येत नाही. मात्र, या सगळ्या राजकारणात गावातील वातावरण मात्र बिघडत जाते. या चित्रपटांचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात राजन पाटील, शहाजी काळे, भारत गणेशपुरे, संजय कुलकर्णी, नंदकिशोर कुलकर्णी आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.