'बॉईज'ची नाबाद पन्नाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 04:15 AM2017-10-27T04:15:14+5:302017-10-27T09:54:45+5:30

'आम्ही लग्नाळू' म्हणत तरुणाइंच्या मनात धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या 'बॉइज' सिनेमाला नाबाद ५० दिवस पूर्ण झाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होऊन ...

Boy's unbeaten fifty | 'बॉईज'ची नाबाद पन्नाशी

'बॉईज'ची नाबाद पन्नाशी

googlenewsNext
'
;आम्ही लग्नाळू' म्हणत तरुणाइंच्या मनात धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या 'बॉइज' सिनेमाला नाबाद ५० दिवस पूर्ण झाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाले असले तरी, युथने डोक्यावर उचलेला हा सिनेमा आजही सिनेमागृहात हाउसफुल पाहिला जात आहे. 'बॉईज' ची रंगीत दुनिया मांडणाऱ्या या सिनेमाचे महाराष्ट्रात १२५ चित्रपटगृहांमध्ये १५०० हुन अधिक शोज सुरु आहेत. एव्हढेच नव्हे, तर त्याचीख्याती सिंगापूरपर्यत पसरली असून, तेथील स्थानिक मराठीभाषिक प्रेक्षकांच्या विशेष मागणीमुळे 'बॉईज' सिनेमाचे खास स्क्रीनिंग सिंगापूरमध्ये ठेवण्यात आले होते. 

तीन मित्रांचे विश्व मांडणा-या या सिनेमात विनोदाचा एक वेगळाच दर्जा पाहायला मिळतो. मिष्कील आणि तरुणाईला आवडेल अश्या शाब्दिक कोट्यांचा यात भरभरून वापर करण्यात आला असल्यामुळे, हासिनेमा विनोदाचा उच्चांक गाठतो. सुप्रसिद्ध संगीतकार आणि सिनेदिग्दर्शक अवधूत गुप्ते यांची प्रस्तुती या सिनेमाला लाभली असून, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्रशिंदे निर्मित 'बॉईज'या सिनेमाचे विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शन केले आहे. पार्थ भालेराव , सुमंत शिंदे, आणि प्रतिक लाड या तिकडींच्या 'बॉईज'गिरी वर आधारलेला हा सिनेमा यावर्षीचा सर्वाधिक कमाईकरणारा मराठी चित्रपट ठरला आहे.

बॉईज या चित्रपटात शिल्पा तुळसकर कबीरच्या आईची भूमिका साकारली आहे. शिल्पा सांगते, दिग्दर्शकासमोर कोरी पाटी घेऊन गेले की, दिलेली भूमिका सहजतेने साकारता येते असे मला वाटते. त्यामुळे या चित्रपटाच्याबाबतीत देखील मी तसेच केले आणि त्यामुळे माझी भूमिका चांगलीच खुलून आली आहे. या चित्रपटात शर्वरी जमेनीस कबीरच्या मावशीची भूमिकेत दिसली. ती सांगते, बॉईज या चित्रपटाची कथा हॉस्टेल लाईफवर आधारित असल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण करताना मला 'बिनधास्त' या माझ्या चित्रपटाची सतत आठवण येत होती तर या चित्रपटाचे निर्माते राजेंद्र शिंदे सांगतात, पौगंडावस्थेतील वैचारिक द्वंद्व या चित्रपटातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 

Web Title: Boy's unbeaten fifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.