सुयशची लडाखमध्ये बाईक रायडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 18:51 IST2016-08-10T13:21:31+5:302016-08-10T18:51:31+5:30

               मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये झळकलेल्या सुयश टिळकला बाईक रायडिंगची फार आवड आहे. ...

Biyak Raiding in Suyashchi Ladakh | सुयशची लडाखमध्ये बाईक रायडिंग

सुयशची लडाखमध्ये बाईक रायडिंग


/>               मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये झळकलेल्या सुयश टिळकला बाईक रायडिंगची फार आवड आहे. लहानपणा पासूनच आपल्याकडे देखील एक मस्त बाईक असावी आणि दूर कुठेतरी रायडिंग करायला जावे असे स्वप्न सुयशने पाहिले होते. पण म्हणतात ना प्रबळ इच्छाशक्ती असेल तर स्वप्नपुर्ती नक्कीच होते. असेच काहीसे झाले सुयशच्या बाबतीत. सुयशचे बाईक रायडिंगचे स्वप्न नूकतेच पुर्ण झाले असून तो लडाखला बाईकवर जाऊन आला आहे. सुयशने त्याच्या हा थरारक प्रवास सीएनएक्ससोबत शेअर केला आहे. सुयश सांगतो, लेह-लडाख, हिमालयाचे आकर्षण तर मला नेहमीच होते. मला बाईक रायडिंगसाठी लडाखला जायचे होते पण कधी हिंमतच व्हायची नाही. माझे बाबा भुटानला बाईकवर जाऊन आले आणि मला त्यांच्याकडुनच प्रेरणा मिळाली. बाबा जर या वयात जाऊ शकतात तर मी का नाही. मग माझ्या मित्रांच्या गु्रप सोबत मी लडाखसाठी निघालो. जम्मु पासून आमचा प्रवास सुरु झाला. तिकडचे वातावरण, पहाडी लोक यांच्याकडे पाहून खूप काही शिकायला मिळाले. लडाखमधील वातारण कधीही बदलू शकते. जाताना एका ठिकाणी आम्हाला गारांचा पाऊस देखील लागला. बर्फात बाईक रायडिंग करण्याची मजाच काही और असते. लडाखची ही थरारक बाईक रायडिंग ट्रीप माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय होती. 

Web Title: Biyak Raiding in Suyashchi Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.