Birthday Special: सई ताम्हणकर म्हणते दिल तौ बच्चा है जी, पाहिला का तिचा नवीन व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 12:03 PM2021-06-25T12:03:41+5:302021-06-25T12:08:26+5:30

आज सईचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Birthday Special: Sai Tamhankar looks Cute In Her Recent New Video | Birthday Special: सई ताम्हणकर म्हणते दिल तौ बच्चा है जी, पाहिला का तिचा नवीन व्हिडीओ

Birthday Special: सई ताम्हणकर म्हणते दिल तौ बच्चा है जी, पाहिला का तिचा नवीन व्हिडीओ

googlenewsNext

जपून जपून पुढे धोका आहे,..म्हणत रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. आज सईचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. चाहत्यांसह तिच्या सिनेमाविषयी आणि खासगी आयुष्यातली खास माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच सोशल मीडियावर तिने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. मजेशीर अंदाजातला व्हि़डीओ पाहून चाहतेही हसून हसून लोटपोट होत आहे. सईने शेअर केलेला व्हिडीओ नेमकं तिच्या आगमी सिनेमाविषयी दिलेली हिंट तर नाही ना?  तर काहींनी तिच्या वाढदिवस असल्यामुळे तिने हा व्हिडीओ शेअर केला असल्याचे म्हणताना दिसत आहे. वाढदिवसाच्या एक दिवसा आधीच हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

 ग्लॅमरस बोल्ड दिसणारी सई व्हिडीओमध्ये क्युट अंदाजात दिसत आहे.  कारण व्हिडीओमध्ये यावेळी सई ग्लॅमरस अंदाजात दिसत नसून लहानमुलींप्रमाणे हावभाव करत असल्याचे पाहायला मिळत असून हेअरस्टाईलही लहान मुलींसारखीच आहे. हा व्हिडीओ पाहून आजही तुम्हीही म्हणाल दिल तौ बच्चा है जी..... ​सई ताम्हणकरला त्याच साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके काम करण्यात जास्त रस असतो. त्यामुळे नेहमीच रसिकांना काय वेगळे देता येईल याच्याच ती प्रयत्नात असते

Web Title: Birthday Special: Sai Tamhankar looks Cute In Her Recent New Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.