प्रियाने घडवली बाईक सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 17:56 IST2016-08-12T12:26:13+5:302016-08-12T17:56:13+5:30

 प्रियांका लोंढे                    नेहमीच विविध भूमिकांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी प्रिया बापट ...

Bike ride made by Priya | प्रियाने घडवली बाईक सफर

प्रियाने घडवली बाईक सफर

 
m>प्रियांका लोंढे
    
              नेहमीच विविध भूमिकांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी प्रिया बापट लवकरच आपल्याला दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत चित्रपटात दिसणार आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या प्रत्येक भूमिकेचेच प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. दर वेळेस ऐका वेगळ््या रुपात दिलीप प्रभावळकर आपल्याला पहायला मिळतात.  पिंपळ नावाच्या चित्रपटात एकदमच निराळ््या अंदाजात दिलीप प्रभावळकर आणि प्रिया बापट प्रेक्षकांसमोर येणार आहेत. पांढरीशुभ्र झुबकेदार दाढी वाढवलेले दिलीप प्रभावळकर या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार याची मात्र उत्सुकता आहे. तर प्रिया बापट देखील हटके लुकमध्ये या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नूकतेच पुण्यामध्ये या चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यावेळेस प्रियाने चक्क बाईकवरू न दिलीप प्रभावळकर यांना पुणे दर्शन घडवून आणले. दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत केलेल्या बाईक सफरीचे पैलू प्रियाने सीएनएक्ससोबत  उलगडले. प्रिया म्हणाली मला दिलीप काकांसोबत बाईकवरुन फिरायला फारच मज्जा आली. मी खरतर पुण्यातील रस्त्यांवर कधी गाडी चालवली नव्हती. त्यात दिलीप काकांना डबलसीट घ्यायचे म्हणजे मला थोडे टेन्शनच आले होते. पण आम्ही दोघांनीही चित्रीकरणाच्यावेळी फारच धमाल केली. मी पहिल्यांदा दिलीप काकांसोबत काम करीत आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनूभव तर मस्तच होता. एका चांगल्या विषयावर काम करायला मिळाल्याने आनंदच आहे. प्रियाने दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतचा बाईक रायडिंग करतानाचा झक्कास फोटो देखील सीएनएक्ससोबत शेअर केला आहे. या दोघांची ही धमाल बाईक रायडिंग पाहण्यासाठी आपल्याला चित्रपटाचीच वाट बघावी लागणार आहे. 

 
 

Web Title: Bike ride made by Priya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.